शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांमधील शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST

विजय मुंडे जालना : शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत ...

विजय मुंडे

जालना : शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत केवळ नऊ हजार ४२९ शिक्षकांनी लसीकरण करून घेतले आहे. विशेषत: खासगी शाळांमधील सहा हजारांवर शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती अद्याप जिल्हा परिषदेकडे अप्राप्त आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळेला कुलूपच लागले होते. विशेषत: दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले आहे. कोरोनाच्या कालावधीत मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची तयारी शासनस्तरावरून करण्यात आली. त्याचवेळी शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. माध्यमिकच्या शाळा सुरू करताना शिक्षकांच्या लसीकरणासह कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात आता प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याची तयारी शासन करीत असून, शिक्षकांचे लसीकरण विशेष ड्राइव्ह राबवून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेकडूनही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जात आहे. जिल्ह्यातील १६ हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ ११ हजार ९६८ जणांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात १० हजार ८०५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर ११६३ जणांचे लसीकरण झालेले नाही. यात १० हजार ३५९ शिक्षकांपैकी ९ हजार ४२९ शिक्षकांचे लसीकरण झाले आहे, तर ९३० जणांचे लसीकरण झालेले नाही. १६०९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १४०७ जणांचे लसीकरण झाले आहे, तर २०२ जणांचे लसीकरण झालेले नाही. विशेष म्हणजे अद्याप सहा हजारांवर शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहितीच प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी सूचना देऊनही माहिती न देणाऱ्या शिक्षकांसह संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोट

शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजवर १० हजार ८०५ जणांच्या लसीकरणाची माहिती उपलब्ध झाली आहे. उर्वरित शिक्षकांसह संबंधित शाळा, संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेळेत होईल.

कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी प्रा.