बदनापूर : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, सर्व याद्यांमध्ये ठराविक लोकांनी आर्थिक गैरव्यवहार, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून फेरबदल केल्याचा आरोप माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला.
बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस महाविकास आघाडीचे तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार संतोष सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बदनापूर नगरपंचायतच्या मतदार यादीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी, संबंधित बीएलओ, निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मॅनेज करून हद्दीबाहेरील बाेगस नावे मतदार यादीमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप सांबरे यांनी केला. तसेच निवडणूक विभागाने आणि उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच बोगस नावे काढून १ ते १७ वार्डाची सीमा, नकाशा तयार करून वार्डनिहाय मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणीही सांबरे यांनी केली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, युवा सेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास मदन, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जऱ्हाड, शेख मतीन, युवा सेना जिल्हा समन्वयक भरत सांबरे, शहरप्रमुख राजू जऱ्हाड, नगरसेवक फेरोज पठाण, मुज्जमील सय्यद, इकबाल शेख, अकरम खान पठाण, दीपक कायंदे, राहुल जऱ्हाड, शिकूर बेग, सुनील बनकर, कैलास खैरे, सुरेंद्र श्रीसुंदर, रामभाऊ उनगे, मच्छिंद्र होळकर, अंबादास कोळसकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास मदन, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पांडुरंग जऱ्हाड, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वर, नगरसेवक शेख मतीन, शहराध्यक्ष श्रीमंत जऱ्हाड, शेख इक्बाल, सय्यद मुजम्मिल, शेख तारेक, प्रशांत जऱ्हाड, सुरेंद्र श्रीसुंदर, अशोक ढगे आदींची उपस्थिती होती.
फोटो