शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी मरकड, उपाध्यक्षपदी गोरंट्याल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:58 IST

जालना : ग्रामीण भागाचा अर्थकणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी करण्यात आली.

जालना : ग्रामीण भागाचा अर्थकणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज मरकड यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्ष माजी आ. कैलास गोरंट्याल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक पदांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, पांडुरंग जऱ्हाड, मनोज मरकड, सतीश टोपे, जिजाबाई जाधव, सत्यभामा कोल्हे, चंद्रमणर खरात, बबन राऊत, संदीप गोरे, राहुल बबनराव लोणीकर (यादव), भाऊसाहेब जाधव, प्रदीप मरकड आदी १५ संचालक बिनविरोध निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा उढाण आणि भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे हे मतदानातून निवडून आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यात अध्यक्षपदी मनोज मरकड, तर उपाध्यक्ष पदी माजी आ. कैलास गोरंट्याल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतषबाजी करुन जल्लोष केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बबलू चौधरी, राजेंद्र राख, विनोद यादव, राजस्वामी, रवी गुल्लापेल्ली, राहूल शिंदे, वैभव उगले, शेख महेमूद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)