शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

...तर आघाडीच्या अडचणी वाढणार!

By admin | Updated: November 17, 2016 00:48 IST

जालना गत पाच वर्षे जालना नगर पालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता मावळली

राजेश भिसे  जालनागत पाच वर्षे जालना नगर पालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता मावळली असून, नगराध्यक्ष पदाच्या युती पुरस्कृत उमेदवार शकुंतला कदम यांनी राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केल्याने आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच घनकचरा प्रकल्प, फुले मार्केटचे पुनर्निर्माण, अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम आदी रखडलेल्या कामांमुळे आघाडीला ही निवडणूक सोपी राहिली नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गत काही दिवसांपासून जालना नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते अर्ज मागे घेण्यापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून संगीता गोरंट्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, युतीने अपक्ष उमेदवार शकुंतला कदम यांना पुरस्कृत केले.दरम्यान, तुल्यबळ लढतीची शक्यता दिसत नसल्याने आघाडीच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, राजकारणात कधीही काहीही कायमस्वरुपी नसते. याचा आघाडीच्या नेत्यांना विसर पडला. गत २० ते २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या शकुंतला कदम यांनीही आपला अनुभव पणाला लावत राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. गत पाच वर्षांत शहराची बकाल अवस्था झाली असून, मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत असल्याचे चित्र असून, कदम यांचा निवडणूक प्रचारात याच मुद्द्यांवर भर राहणार असल्याचे दिसून येते आहे. शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. घनकचरा प्रकल्प या ना त्या कारणांमुळे रखडला आहे. स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुख्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मार्केटचे पुनर्निर्माण रखडल्याने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांत असंतोष आहे. तर दुसरीकडे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी ते बकाल झाले आहे. एकूणच रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मतदारांमध्ये रोष असल्याने ही निवडणूक आघाडीसाठी सोपी नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे असले तरी शिवसेना-भाजपा युतीचा अधिकृत उमेदवार नसल्याने निश्चिंत झालेल्या आघाडीच्या नेत्यांना यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.