शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित... बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

(सेंट्रल डेस्क, दिल्ली, प्रादेशिकसाठी) भोकरदन (जालना) : कंपनीतील गेलेली नोकरी, गावात हाताला न मिळणारे काम आणि घरातील अडचणी सोडविण्याचा ...

(सेंट्रल डेस्क, दिल्ली, प्रादेशिकसाठी)

भोकरदन (जालना) : कंपनीतील गेलेली नोकरी, गावात हाताला न मिळणारे काम आणि घरातील अडचणी सोडविण्याचा प्रश्न यामुळे चिंतित झालेल्या एका २२ वर्षीय बेराेजगार युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सुरंगळी (ता. भोकरदन, जि. जालना) येथे मंगळवारी सकाळी समोर आली.

समाधान साळुबा फोलाने (२२) असे मयत युवकाचे नाव आहे. सुरंगळी येथील समाधान फोलाने याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. समाधान फोलाने याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरातील परिस्थिती जेमतेम. त्यात दीड एकर शेतीतूनही उत्पन्न मिळत नव्हते आणि घरातील प्रश्नही सुटत नव्हते. त्यामुळे समाधान फोलाने हा तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील कंपनीत कामाला गेला होता. तेथे काम करून येणाऱ्या पगारातून सुरंगळी येथील कुटुंबाला मदत करीत होता. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले आणि समाधानची नोकरी गेली. गावात आल्यानंतर काही दिवस शेतात तर काही दिवस इतर ठिकाणी जाऊन तो काम करीत होता. मात्र, गत काही दिवसांपासून त्याच्या हाताला काम नव्हते. कंपनीतही नोकरी मिळेल की नाही ? याची चिंता त्याला होती. त्यामुळे समाधान चिंतित होता. याच चिंतेतून समाधानने सोमवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी तो उठला नसल्याने नातेवाइकांनी त्याला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाइकांनी आतमध्ये पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पंचनाम्यानंतर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस नाईक एन. एस. जाधव करीत आहेत.

नातेवाइकांचा आक्रोश

घरातील समस्या सोडविण्यासाठी समाधान औरंगाबादेतील कंपनीत काम करीत होता. कोरोनामुळे तो गावात येऊन राहू लागला. मात्र, हाताला काम नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबातील सदस्यांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

फोटो- मयत समाधान फोलाने (22 जेएनपीएच01)