यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंध होते. अशाही स्थितीत शिवप्रेमींचा उत्साह टिकून होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, आर. आर. खडके, विजयकुमार पंडित, ज्ञानदेव पायगव्हाणे, विश्वासराव भवर, अशोक आगलावे, शिर्के, समितीचे अध्यक्ष रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, सचिव ॲड. रवींद्र डुरे, कोषाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष विमल आगलावे, क्रांती खंबायतकर, शीतलताई तनपुरे, सुवर्णा राऊत, विभावरी ताकट, गणेश सुपारकर, सागर देवकर, तय्यब देशमुख, प्रकाश जगताप, संजय देठे, राजेंद्र गोरे, प्रशांत गाढे, शिवाजी तनपुरे, दिगंबर राव पेरे, सुरेश गाजरे, संतोष गाजरे, विजय वाढेकर, भरत मानकर, विलास तिकांडे, प्रवीण बावणे, गजानन लाखोले, भुरेवाल, घनश्याम बिर्ला, सुशील शिंदे, मुन्ना गजभिये, रवी खांडेकर यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व शिवप्रेमींची उपस्थिती होती.
चौकट
शिवसनेकडून अभिवादन
शिवजयंतीनिमित्त माजी मंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत शहरप्रमुख आत्मानंद भक्त, नगरसेवक विष्णू पाचफुले, विजय पवार, संतोष जांगडे, संदीप नाईकवाडे, गोपी गोगडे, लखन कनीसे, घनश्याम खाकीवाले, अरुण काकडे, राजू ससलामपुरे, किशोर शिंदे, राजू घोडे, नरेश कपूर, रामेश्वर कुदल, दिनेश भगत, विकास शिरसागर, ॲड. बबन मगरे यांच्यासह शिवसैनिक सैनिकांची उपस्थिती होती.
चौकट
आमदार कैलास गोरंट्याल अभिवादन
आमदार कैलास गोरंट्याल यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन केले. याचवेळी गांधीचमन येथील कार्यक्रमासही त्यांनी हजेरी लावली. यावेळी नगरसवेक महावीर ढक्का यांच्यासह अन्य काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. या आधीच आपण शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी जालना पालिकेने ५० लाख रुपये दिले आहेत. लवकरच हायड्रॉलिक सीडी बांधणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. तसेच त्यांनी शिवजयंतीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
===Photopath===
190221\19jan_31_19022021_15.jpg~190221\19jan_32_19022021_15.jpg~190221\19jan_33_19022021_15.jpg
===Caption===
फोटो क्रमांक १, आ. कैलास गोरंट्याल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ~ माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. ~ शिवाजी महाराजांच्याय जयंती निमित्त उत्सव सिमतीकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर.