शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर ग्रामस्थांना मिळाले पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ ...

परतूर : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यावर उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य पथकही दाखल झाले असून, ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे.

तालुक्यातील बाबुलतारा गावात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला, शिवाय ५० जणांना कोरोनाची लागणही झाली आहे. त्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाढती रुग्णसंख्या व असलेली पाण्याची टंचाई, यामुळे ८० टक्के लोक शेतात राहण्यासाठी गेले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवार व शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येकाची कोरोनाची चाचणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीने पाइपलाइनची जोडणी करून पाणी सोडले, शिवाय गावात औषध फवारणीही करण्यात आली आहे.

बाबुलतारा या गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात औषधी फवारणी करण्यात आली आहे. आरोग्य पथकाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाग्रस्तांना आंबा येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

- अंकुश गुंजकर, गटविकास अधिकारी

बाबुलतारा १२०० लोकसंख्येचे गाव असून, आतापर्यंत २२५ लोकांची तपासणी करण्यात आली. त्रास असलेल्या लोकांची काळजी घेण्यात येत आहे.

- डॉ. सय्यद जाहेद, तालुका आरोग्य अधिकारी, परतूर