शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वालसावंगी परिसरात लाल मिरचीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे; परंतु मिरचीला ...

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे; परंतु मिरचीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारपेठेत मिरचीला ४ ते १२ रुपये किलोपर्यंत जेमतेम भाव मिळत आहे. मिरची तोडणीसाठी ६ रुपये किलोप्रमाणे मजुरी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी आता हिरव्या मिरचीची तोडणी बंद केली आहे. शेतकरी झाडालाच मिरची लाल होऊ देत आहेत. लाल मिरचीला बाजारात चांगला भावही मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे मिरचीला भाव नसल्याने वालसावंगीसह पारध, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वाढोणा, लिहा, शेलूद, पोखरी आदी भागांतील शेतकरी मिरचीवर नांगर फिरवत असल्याचे चित्र आहे.

मिरचीला पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात ४ ते १२ रुपये किलोंचा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे मजुरीवर झालेला खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी लाल मिरचीकडे वळाला आहे. लाल मिरचीला बाजारपेठेत भावही चांगला आहे.

- कौतिक गवळी, वालसावंगी

म्हणून कवडीमोल भाव

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे बांगलादेशासह आदी भागांत मिरचीची वाहतूक ठप्प झाली आहे. माल परदेशासह राज्यात जाणे बंद झाले आहे. त्यामुळे मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.