शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या ...

रामनगर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान

जालना : तालुक्यातील रामनगर व परिसरात गत दोन दिवस दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याशिवाय फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

जाफराबाद येथे पोषण आहार पंधरवाडा

जाफराबाद : येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत जाफराबाद शहरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पंधरवडा उपक्रमाची सुरूवात बुधवारी करण्यात आली. दरम्यान, पर्यवेक्षिका शारदा गोफणे यांनी बालकांना, गरोदर मातांना अंगणवाडी अंतर्गत देण्यात येत असलेल्या सकस आहाराबाबत माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका रेखा केदारे, कविता मंडलिक, पंचशिला पांडव, नसीमा पठाण, रत्नप्रभा मगरे, सुनीता सुरडकर, सुनीता गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चंद्रसेन कोठावळे यांचा सत्कार

अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. चंद्रसेन कोठावळे यांची घनसावंगी येथील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गायकवाड, डॉ. राजेंद्र गायकवाड, अंबडचे प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे आदींनी स्वागत केले आहे.

पिंपळगाव परिसरात पिके बहरली

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच बुधवारी सकाळपासूनच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या श्रावण सरी कोसळत होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य होऊन वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

जालना : भोकरदन तालुक्यातील रामनगर येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे ही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांसह जनावरांनाही या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी

अंबड : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.