शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘ई-नाम’ तीन वर्षांपासून कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:05 IST

र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.

ठळक मुद्देजालना बाजार समिती : एमएसईपी अंतर्गत जालन्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार यापूर्वीच झाले आॅनलाईन पद्धतीने

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बाजार समिती संदर्भात ई-नाम प्रणालीचा उल्लेख करुन खळबळ उडून दिली आहे. ही प्रणाली अंमलात आणणाऱ्या बाजार समित्या बरखास्त का ? करण्यात येऊ नये असे सांगून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. असे असलेतरी जालना बाजार समितीने या पूर्वीच एमएसईपी अंतर्गत ई-नाम प्रणालीचाच एक भाग असलेला व्यवहार सर्व आॅनलाईन केला आहे. याला आता तीन वर्ष झाली आहेत.निर्मला सीतारामण यांच्या दिल्लीतील कृषी वित्त परिषदेमध्ये मार्गदर्शन करतांना बाजार समित्यांची कार्यपध्दती आणि कामकाज यावर गंभीर टिप्पणी केली. यामुळे जालना बाजार पेठेतही याचे पडसाद उमटले. यांसदर्भात जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर तसेच निवृत्त सचिव गणेश चौगुले यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना बाजार समितीने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या सुचनेनुसार एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते.त्यात शेतकºयांनी आणलेल्या शेतमालाची नोंद आॅनलाईन घेण्याची पध्दती सुरु केलेली आहे. याअंतर्गत आजघडीला १ लाख ८० हजार शेतकºयांची नोंदणी झालेली आहे.जालना बाजार समितीने २०१६ मध्ये ही प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे या अर्थमंत्री सीतारामण यांच्या घोषणेचा जालन्यातील बाजार समिती तसेच आडत व्यापारी आणि शेतकºयांवर कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही.ही प्रणाली २००९ मध्ये राबविण्याचे तत्कालीन आघाडी सरकारने जाहीर केले होते. या अंतर्गत जालन्यासह राज्यातील ४० पेक्षा अधिक बाजार समित्यांनी आपले व्यवहार आॅनलाईन केले आहेत. बाजार समित्या या शेतकरी आणि व्यापाºयांसाठी महत्वाची भूमिका निभावतात. शेतकºयांनी उत्पादीत केलेला माल विक्रीसाठी कुठे आणावा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच बाजार समित्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. आता या नवीन नियमामुळे बाजार समित्यांना आपले सर्व व्यवहार हे संगणकीकृत आॅनलाईन व्यवहाराव्दारे करावे लागणार आहे. शेतमालाची पारंपारिक पध्दती बंद होवून आता केंद्र सरकार राष्ट्रीय बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणू पाहत आहे. याचाच एक भाग म्हणून ई-नाम अर्थात इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

आम्ही काळाची गरज ओळखतोआजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जात आहे. प्रत्येक गोष्ट डिजिटल होत चालली आहे. त्यामुळे जालना बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने तत्कालीन कृषी आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ई-नाम समकक्ष एमएसईपी अंतर्गत आॅनलाईन व्यवहार सुरु केले होते. भविष्यात आणखी नवीन सूचना प्राप्त झाल्या तर त्याचीही आम्ही अंमलबजावणी करु.- अर्जुन खोतकर,सभापती तथा माजी राज्यमंत्री

टॅग्स :JalanaजालनाMarket Yardमार्केट यार्ड