शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बाजार बंदमुळे व्यापाऱ्यांकडून जनावरांना कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST

जामखेड : कोरोनामुळे जामखेड परिसरातील बंद करण्यात आलेले जनावरांचे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून जनावरांना ...

जामखेड : कोरोनामुळे जामखेड परिसरातील बंद करण्यात आलेले जनावरांचे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून जनावरांना कवडीमोल दर दिला जात आहे.

मागील एक वर्षापूर्वी जनावरांचा आठवडी बाजार भरायचा. बाजारात शेतकरी गाई, म्हशी, शेळी, बोकड ही जनावरे विक्रीसाठी आणायचे. जनावरांच्या खरेदी - विक्रीतून आर्थिक अडचणी दूर व्हायच्या. अंबड येथील गुरुवारचा, सुखापुरी येथील शनिवारचा, वडीगोद्रीतील शुक्रवारचा, पैठण तालुक्यातील पाचोड येथील रविवारचा, तसेच आडूळ येथील मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. व्यापारी त्यांच्याकडून विविध जातीच्या गाई, बैल, शेळ्या, बोकड आणतात. परिसरातील शेतकरी गाई, बैल, म्हैस, शेळ्या, बोकड विक्री करून घरखर्च किंवा शेतीकामे खर्च भागवितात. काही व्यापारी देखील या मालाला उठाव देतात. त्यामुळे ही उलाढाल चांगलीच होत असते. परंतु, कोरोनामुळे वरील ठिकाणचे आठवडी बाजार बंद आहेत. आता तर चक्क शेळी, बोकड याचे फोटो काढून व्हाॅट्स ॲपवर पाठवून त्यांच्या विक्रीचे प्रयत्न केले जात आहेत. कोणाला आवडले तर तो व्यापारी, शेतकरी येतात, पाहणी करतात आणि खरेदी करून नेतात. परंतु, शेतकऱ्यांना बाजारभाव हवा तसा मिळत नाही. ठराविकच व्यापारी येत असल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री केली जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब पाहता, बंद असलेले जनावरांचे आठवडी बाजार पुन्हा सुरू करावेत, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी अमोल डोईफोडे, चंद्रहास तार्डे, रशीद कुरेशी, रामेश्वर पवार, गोरख डोईफोडे, गोरख जाधव आदींनी केली आहे.