शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

‘दिखावे पर मत जाओ...अपनी अकल लढ़ाओ!’

By admin | Updated: May 24, 2014 01:39 IST

पंकज कुलकर्णी, जालना लहानांपासून मोठ्यांपर्यंत रंग सर्वांच्याच आवडीचे आहेत. ते जेवढे आकर्षक आहेत, तेवढेच आरोग्यासाठी घातक ठरत आहेत.

पंकज कुलकर्णी, जालना लहानांपासून मोठ्यांपर्यंत रंग सर्वांच्याच आवडीचे आहेत. ते जेवढे आकर्षक आहेत, तेवढेच आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. खाद्यपदार्थांमधून होत असलेला रंगांचा वापर आरोग्याच्या विविध समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. आजघडीला कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात रंग वापरलेल्या पदार्थांनी बाजारपेठा तुडुंब भरलेल्या आहेत. या खाद्य पदार्थांवर आपण येथेच्छ ताव मारतो. किंबहुना या पदार्थांच्या आकर्षक रंगाकडे आपण आपसूकच आकर्षित होतो. परंतु ते पदार्थ खाणे किती धोकादायक आहे, हे ते खाताना लक्षात येत नाही. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च (विष चिकित्सा संशोधन)’ या संस्थेतील वैज्ञानिकांनी भारतीय बाजारपेठांतील खाद्य पदार्थाचे नमुने तपासले. या सर्व नमुन्यांमध्ये मर्यादेच्या कितीतरी अधिक पटीने रंग वापरात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे १२ टक्के खाद्यपदार्थांमध्ये घातक रंग वापरात येतात. खाद्यपदार्थात वापरण्यात येणार्‍या रंगांचे दोन प्रकार आहेत. ‘फूड’ आणि ‘नॉनफुड कलर’ फूड कलर म्हणजे खाद्यपदार्थांमधून वापरण्यात येणारे रंग तर नॉन फुड कलर म्हणजे अन्नपदार्थांव्यतिरिक्त इतर बाबींसाठी असणारे कलर. अधिकृतरीत्या नैसर्गिक रंग वापरण्याचीच परवानगी अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. यामध्ये लाल, हिरवा, पिवळा या प्रकारचे आठ रंगांचा समावेश आहे. खाद्यान्न उद्योगात विविध वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादक, व्यापारी हे भरमसाठ रंगांचा वापर करीत आहे. त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. केशर, बीट, मिरची, हळद, स्ट्रॉबेरी यापासून बनविण्यात आलेल्या रंगांना प्रमाणित करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश खाद्य पदार्थांमधून ‘सिंथेटीक’ रंग वापरण्यात येत आहेत, ते धोकादायक आहेत. रोडामाईन बी (लाल), आॅरेंज -२ (केशर), मेटानील यलो (पिवळा), सुदान-आय (केशरी/लाल), मेलाशाईट ग्रीन (हिरवा), अ‍ॅमरानथ (लाल) हे रंग खाद्यपदार्थांमध्ये वापरात येतात. विशेष म्हणजे यामधील काही रंगांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या रंगांमुळे वाढ खुंटणे, अ‍ॅनिमिया, किडनी, लिव्हरचे आजार, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, रक्ताशयापासून कर्करोगापर्यंतचे आजार संभवतात. समारंभांमधून विविध रंगांच्या सरबतांसह खाद्यपदार्थ पहावयास मिळतात, परंतु त्यामध्येही घातक रंगाचाच वापर केला जातो. ढाबे, हॉटेल्समधील चिवडा, बुंदीसह काजुकरी, पालकपनीर, नवरतन कोरमा, तिरंगा यासारख्या भाज्यांत धोकादायक रंग वापरले जातात. दैनंदिन वापराच्या मिरची पावडर, मसाले, बडीशोपमध्येही रंगांचे प्रमाण अधिक आहे. मिरची पावडरमध्ये ‘लेडक्रोमेट’ तर हैद्रबादी बडीशोपला हिरवागार दिसण्यासाठी रंग देण्यात येतो, त्यामुळेच ग्राहक आकर्षित होतात.फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्डझ् अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया या संस्थेने सर्वसाधारणपणे दररोज किती प्रमाणात रंग सेवन करावे, याचे परिमाण दिले आहे. प्रत्येकाने दिवसाला १०० मिलीग्रॅम/ किलो एवढ्या प्रमाणात रंग घेतल्यास ते हानीकारक ठरत नाही. असे असले तरी जालना जिल्ह्यात रंगांचे प्रमाण मोजण्यासाठी प्रयोगशाळा किंवा कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतच नमुने पाठवावे लागतात. यासाठी शासनाने जिल्हास्तरावर प्रयोगशाळा स्थापन कराव्यात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.अन्न व औषध प्रशासन किंवा शासनाने विविध खाद्यपदार्थात कोणते व किती प्रमाणात वापरायचे याचे निर्देश दिले असले तरीही स्वीटमार्ट, ज्युस सेंटर्स तसेच इतर किरकोळ विक्रेत्यांकडे त्याचे कुठलेच परिमाण नाही. पेढे, जिलेबी आदी गोड पदार्थ बनविताना आकर्षक दिसेपर्यंत रंग टाकण्यात येतो. त्याचे प्रमाण ठरलेले नसते. रंगाकडे आकर्षित होण्याचे टाळत कमीत कमी रंग असलेले पदार्थच घ्यावेत, जेणे करून आरोग्याच्यादृष्टीने ते फायदेशीर ठरेल. मुलांचा हट्ट पुरविताना त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रंगाच्या धोक्यांबद्दल नागरिकांसह सामाजिक संस्था व विक्रेत्यांमध्येही जनजागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे मत मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.