शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तपोधाम भक्तिमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:33 IST

कर्नाटक गजकेसरी प.पू. श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीचा सोहळा मंगळवारी येथील गुरुगणेश तपोधामात भक्तिभावाने पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कर्नाटक गजकेसरी प.पू. श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीचा सोहळा मंगळवारी येथील गुरुगणेश तपोधामात भक्तिभावाने पार पडला. देशभरातील ५० हजार भाविकांनी यानिमित्त शहरात हजेरी लावल्यामुळे तपोधामाला यात्रेचे स्वरूप आले होते. भव्य मंडप, पांढ-या पोशाखातील श्रावक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे अवघे तपोधाम भक्तिमय बनल्याचे पाहावयास मिळाले.सकाळी मंगल पठणाने गुरुगणेश गुणगान सभेला प्रारंभ झाला. पुण्यतिथी उत्सवासाठी औरंगाबादहून पायी दिंडीत सहभागी महिला भाविकांच्या हातातील १५० मीटर लांबीच्या ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुणगान सभेत प.पू. श्री. सौरवमुनीजी यांची मंगलचरण सभा झाली.या वेळी जैन श्रावक संघाचे महामंत्री स्वरुपचंद ललवाणी यांनी तपोधामांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रम व प्रकल्पांची माहिती दिली.मुख्य कार्यक्रमास उपस्थित पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, की गुरुगणेश तपोधामाचा विकास करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. येथील विकास कामांना आपण सहकार्य करू.या वेळी साध्वी पंकजाश्रीजी म.सा., प.पू. पुण्यस्मिताजी म.सा यांनी उपस्थितांना उपदेश केला. जैन श्रावक संघाचे नरेंद्र लुणिया, संजयकुमार मुथा यांनी विचार मांडले. तपोधामाच्या विकास कामात सहकार्य करणा-या दानशूरांचा सत्कार करण्यात आला.प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांना कोटा संघ प्रमुख पदवी देऊन चादर ओढण्यात आली. त्याचबरारेबर प.पू. प्रतिभाजी म.सा. यांना कोटा संघ प्रवर्तनाची पदवी प्रदान करण्यात आली.माजी आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी तपोधाम स्थळी उपस्थित राहून, येथील विकासाकरिता कायम प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प.पू. सौरवमुनीजी म.सा. प.पू.प्रणवमुनीजी म.सा. प.पू. गौरव मुनीजी म.सा यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नांदेडचे माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जैन महामंत्री पारस मोदी, वीरेंद्र धोका, चेन्नई येथील उद्योगपती आनंद चांदणी यांनी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या समाधीचे दर्शन घेतले.पुण्यतिथी सोहळ्यासाठी श्रावक संघाचे संघपती स्वरुपचंद रुणवाल, अध्यक्ष संजयकुमार मुथा, महामंत्री स्वरुपचंद ललवाणी, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, कोषाध्यक्ष डॉ. गौतमचंद रुणवाल, सहसचिव विजयराज सुराणा, विश्वस्त सुरेशकुमार सकलेचा. डॉ. धरमचंद गादिया, कचरुलाल कुंकूलोळ, भरत गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा यांनी पुढाकार घेतला.