आपण ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या मुंबईतील घरी जाण्याचा योगही अनेकवेळा आल्याची आठवण ओबीसी चळवळीचे नेते अन्सारी यांनी सांगितले.
दिलीप कुमार यांनी जालन्यात आयोजित ओबीसींच्या मेळाव्यात हजर राहावे अशी विनंती आपण त्यांना एका भेटीत केली होती. त्यावेळी ती मान्य करीत, ऑगस्ट १९९८ सरस्वती भुवनमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय ओबीसी संमेलनास त्यांनी हजेरी लावली होेती. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या भाषणात त्यांनी अनेक मार्मिक किस्से सांगून सर्वांना हसविले होते. विशेष म्हणजे दिलीप कुमार यांच्यासमवेत प्रसिद्ध हाय्य अभिनेते जाॅनी वाॅकर हेही होते.
चौकट -
अभिनते दिलीप कुमार हे राज्यसभेचे खासदार होते. तेथेही ते मुस्लिम समाजातील ओबीसी वर्गातील नागरिकांना त्यांचे हक्क आणि सवलती मिळाल्याच पाहिजेत यासाठी प्रश्न मांडत असल्याची आठवणही अन्सारी यांनी सांगितली. विशेष म्हणजे ज्यावेळी दिलीप कुमार हे जालन्यात आले होते. त्यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पाशा यांच्या घरी त्यांनी भोजनाचा स्वाद घेतला होता.