शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

राक्षसभुवन येथे दत्त जन्मसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:55 IST

अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावलगतचे भारतातील अतिप्राचीन आद्यपीठ असलेले वरददत्त संस्थान राक्षसभुवन येथे २१ डिसेंबर रोजी दत्त जन्मसोहळा सूर्यास्तासमयी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावलगतचे भारतातील अतिप्राचीन आद्यपीठ असलेले वरददत्त संस्थान राक्षसभुवन येथे २१ डिसेंबर रोजी दत्त जन्मसोहळा सूर्यास्तासमयी होणार आहे. २२ रोजी माता अन्नपूर्णादेवी पूजन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थानचे विश्वस्त योगीराज महाराज डोळे, संजय डोळे, सचिन डोळे यांनी सांगितले.गोदावरी नदीकाठ म्हणजे रामायण काळातील दंडकारण्य प्रभू श्रीरामांनी वनवास काळात ज्या स्थानी भेट दिली त्यापैकी एक प्रमुख ठिकाण आहे. महर्षी अत्री व देवी अनसूया यांचा आश्रम या ठिकाणी होता. याच ठिकाणी आज राक्षसभुवन येथील वरद दत्तात्रेय मंदिर आहे. मंदिराची रचना ही आश्रमासारखी असून संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे प्राचीन दत्तमंदिर आहे. गर्भगृह खोलवर असून त्यात दत्तात्रयांची वालुकेपासून निर्मित एकमुखी षड्भुज पूर्णाकृती मूर्ती असून शिरावर नागचा फणा आहे. अशी प्राचीन मूर्ती भारतात इतर कुठल्याही दत्तस्थानी पाहावयास मिळत नाही. या स्थानाचा इतिहास अगदी त्रेता युगातील रामायणकाळाचा मागोवा घेतो. साधारणत: अन्य दत्तस्थानांचा इतिहास दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, द्वितीयावतार नृसिंह सरस्वती यांच्यापासून आढळतो. मात्र मागील १००० ते ११०० वर्षापर्यंत या दत्तस्थानाचा इतिहास सत्ययुग, त्रेतायुगापासून आढळून येतो. या स्थानी महर्षी अत्री आश्रमात सीतामातेला अनसूयामातेने दिव्य अलंकार व दिव्य वस्त्र, उटी वनवास काळातील भेटीदरम्यान दिले होते, असाही उल्लेख आढळतो. रामविजय ग्रंथात कवी श्रीधरांनी वर्णन केल्याप्रमाणे मग अत्रीचिया आश्रमाप्रती येता झाला, जनकजापती तेणे देखीली कैवल्यमूर्ती नाश कालांती असेना; खरोखरच दत्तावतारच असा अवतार आहे. ज्याचा अंत कल्प-कालांतरानंतरही नाही. अगदी राम अवतार, श्रीकृष्ण अवतार यासह भगवंतांचे अन्य अवतारकार्य हे ठराविक कालमर्यादेने संपुष्टात आले. मात्र दत्तात्रेयांचा अवतार हा स्मृतिगामी आहे. अर्थात, स्मरण करताच आगमन करणारी ही देवता आहे.अशा या देवतेचा उल्लेख भगवान परशुरामांचे गुरू, योगाभ्यासाचे जनक महर्षी पतंजली यांचे गुरू आदींपासून आजही अनेक दत्तभक्तांना प्रत्यक्ष अनुभूती दर्शन देणारी देवता म्हणजेच दत्तप्रभू होय. या क्षेत्री अर्वाचीन काळात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, सर्वज्ञ दासोपंत यांच्याबरोबर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांचेदेखील आगमन प्रवासादरम्यान झाल्याचे दाखले आहेत. असे हे प्राचीन दत्तस्थान इतरत्र कुठेही आढळून येत नाही. काहीसे अप्रसिद्ध असल्याने या पवित्र दत्तस्थानाची महती व माहिती अनेकांना नाही. परंतु अनेक भाविकांना या ठिकाणी आलेल्या अनुभूतीमुळे त्यांचा या दत्तस्थानावर विश्वास आहे. दत्तप्रभूंच्या इच्छेशिवाय काही होत नसल्याची प्रचिती अनेकांना या ठिकाणी येत असते. या संस्थानचा क्षेत्राचा महिमा भाविकांना आता ज्ञात व्हावा हीदेखील दत्तप्रभूंचीच इच्छा आहे. या स्थानावर परंपरागत सेवा करण्याचे भाग्य दत्तवर इनामदार डोळे कुटुंबियांना आहे. त्यांची अकरावी पिढी हे कार्य अखंडितपणे करीत आहे. या दुर्मिळ व प्राचीन अशा दत्तस्थानाचा श्रीदत्तजयंती उत्सवास परंपरागत उत्साहात सुरूवात झाली असून, दर्शनासाठी भाविकांची पंचक्रोशीतून मोठी गर्दी होत आहे.एकूणच सध्या दत्त उत्सव सुरू असल्याने राक्षभुवन व परिसरात यात्रेचे स्वरूप आले आहे. एकूण येथील शनि देवतेच्या दर्शनसाही यंदा मोठी गर्दी वाढल्याचे परिसरातील भाविकांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDatta Mandirदत्त मंदिर