शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

मल्लांना मिळाली सात सुवर्णपदके जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथील गुणवंत व्यायामशाळेच्या मल्लांनी सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ...

मल्लांना मिळाली सात सुवर्णपदके

जालना : जालना तालुक्यातील रामनगर येथील गुणवंत व्यायामशाळेच्या मल्लांनी सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग कुस्ती चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत तब्बल सात सुवर्ण पदके मिळविली. यामध्ये ८४ किलो वजन गटात सुवर्णपदक विजेते पहिलवान सुरेश ज्ञानेश्वर यज्ञेकर -जोशी, ५९ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान पृथ्वीराज रमेश यज्ञेकर-जोशी, ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान बाबासाहेब चव्हाण, ८४ किलो वजन गटात सुवर्णपदक पहिलवान आदित्य कांबळे यांचा समावेश आहे.

रोहित्र दुरुस्त करून मिळेना

जालना : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कन्हैयानगर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी रोहित्रांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सध्या शेतकऱ्यांचा सिजन नसतानाही रोहित्रासाठी महिना महिना वाट पाहावी लागत आहे. हा प्रकार वेळीच थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सूचना फलक गायब, चालकांची गैरसोय

भोकरदन : तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकरदन शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच या रस्त्यांवरील सूचना फलक, दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाने गरजेनुसार सूचना, दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

शस्त्रक्रियेसाठी रुग्ण पुण्याकडे रवाना

राणी उंचेगाव : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशनच्या वतीने राणी उंचेगाव येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातील मोतीबिंदू निघालेल्या राणी उंचेगावसह परिसरातील ग्रामस्थांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवारी पुणे येथे पाठविण्यात आले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बालासाहेब शिंदे, सरपंच विठ्ठल खैरे, उद्धव माने, दत्ता राऊत, कृष्णा काटे, राजू राऊत, खेमा कामठे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

परतूरला रस्त्यावर जनावरांचा ठिय्या

परतूर : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे दिवसरात्र ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परतूर शहरातील पालिकेचा कोंडवाडा शोभेची वस्तू बनला आहे. मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा येतो. अनेकदा ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे.

धनगरपिंपरी मंडळात पिके धोक्यात

अंबड : तालुक्यातील धनगरपिंपरी मंडळात मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतशिवारातील पिकांना फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पिकेही धोक्यात आली आहेत. पिकांना केलेला खर्च आता वसूल होणे कठीण होऊन बसले आहे. कृषी व महसूल विभागाच्या वतीने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.