फोटो महसूल, पोलिसांचे दुर्लक्ष ;
केदारखेडा : परिसरातील गिरजा- पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा केला जात आहे. याकडे महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, मेरखेडा, बामखेडा, जवखेडा ठोंबरे, बोरगाव तारु, देऊळगाव ताड, वालसा खालसा, वालसा डावरगाव आदी गावांतील गिरजा व पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्कार मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत असल्याने नदीपात्राची चाळणी झाली आहे. परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. जे वाळू तस्कार पोलीस व महसूल विभागाला पैसे देत नाही. त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. ज्यांनी पैसे दिले आहे, त्यांच्यावर पोलीस व महसूल विभागातील अधिकारी कारवाई करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
परिसरातील नदीपात्रातून होणारा वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून बंद होता. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कारवाईच्या धास्तीने वाळू माफियात घबराट पसरलेली होती. पंरतु, जानेवारीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुन्हा जोमाने वाळू उपसा सुरू झाला आहे.
===Photopath===
200221\20jan_24_20022021_15.jpg
===Caption===
केदारखेडा येथील गिरजा - पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राची अशी अवस्था झाली आहे.