शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नवोपक्रमशील शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती. ...

जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत चौधरी, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय येवते, डॉ. सुनीता राठोड, अधिव्याख्याता डॉ. विनोद राख, डॉ. शिवाजी साखरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश सातव यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या सूचनेनुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील प्राथमिक गटातून ३१, तर माध्यमिक गटातून ९ शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक गटातून बदनापूर तालुक्यातील मेव्हणा जि. प. शाळेतील श्रीकांत ढगे यांना प्रथम, अंबड तालुक्यातील दोदडगाव नीता अरसुळ दिव्तीय, बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील भाग्यश्री म्हसे यांना तृतीय, घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील हेमराज रमधम यांना चतुर्थ, परतूर तालुक्यातील दहिफळ भोगांणे येथील पेंटू म्हैसनवड यांना पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. जालना तालुक्यातील घाणेवाडी येथील सोनाली खेरूडकर, भोकरदन तालुक्यातील उमरखेडा शाळेतील ज्ञानेश्वर झगरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षक व मुख्याध्यापक गटातून बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील श्रीमती एम. आर. पाटील यांना प्रथम, भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील तुषार पडूळ यांना दिव्तीय, घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालय, पिंपरखेड येथील के. एस. घायतिडक यांना तृतीय, जालना तालुक्यातील डग्लस गर्ल्स हायस्कूल येथील कल्पना पाटील यांना चतुर्थ, घनसावंगी तालुक्यातील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती येथील भीमाशंकर शिंदे यांना पाचवे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मंठा तालुक्यातील केंधळी लालबहादूर शास्त्री विद्यालयातील उत्तम धाबले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त झालेल्या ऑनलाईन विज्ञान प्रश्नमंजुषा या स्पर्धेतील गुणांतांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी विषय सहाय्यक जगन वायाळ, दीपक दराडे, श्रीकृष्ण निहाळ, कैलास तिडके, शेख गफार, सहशिक्षक जयंत कुलकर्णी, साधन व्यक्ती प्रफुल्ल राजे, चंद्रकांत गोल्डे, प्रल्हाद सोलाटे, देवा चित्राल, कैलास गायकवाड, सी. बी. जाधव, करुणा हिवाळे, शीतल मिसाळ, मीरा जगदाळे, एस. यू. गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

फोटो