शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

ट्रकची कारला धडक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल जालना : भरधाव वेगाने ट्रक चालवून कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना सोमवारी जालना ...

ट्रकची कारला धडक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

जालना : भरधाव वेगाने ट्रक चालवून कारला पाठीमागून धडक दिल्याची घटना सोमवारी जालना शहरातील एमआयडीसी परिसरात घडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गजानन कांबळे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ. वेताळ हे करीत आहेत.

बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करणारे अटकेत

पारध : बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना पारध पोलिसांनी सोमवारी अटक केली. सचिन भास्कर दांडगे (३४), संजय राजधर दांडगे (४१ दोघे रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सरडे हे करीत आहेत.

दहा जणांची एकास मारहाण

जालना : घरासमोरील रस्ता तयार न केल्याने दहा जणांनी एका कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केल्याची घटना मंठा तालुक्यातील नायगाव येथे सोमवारी घडली. याप्रकरणी सांबशिवराव राजनायडू चिल्ला यांच्या फिर्यादीवरून संशयित अर्जुन देवीदास राठोड, विठ्ठल देवीदास राठोड, करण अर्जुन राठोड, वसंत देवीदास राठोेड, मोहन देवीदास राठोड, राहुल मोहन राठोड, एक महिला, विक्रम वसंत राठोड, सचिन विनायक राठोड, रंजित विनायक राठोड (सर्व रा. मंठा) यांच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ. सरदार हे करीत आहेत.