विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
आंबा : परतूर तालुक्यातील आंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष दत्ताराव घुले, बालासाहेब बोनगे, भगवान कोरडे, नामदेव काळदाते, सलीम सय्यद, विलास डोईफोडे, सुधाकर वाडेकर, विठ्ठल बोनगे, महादेव मस्के, रघुनाथ काळदाते आदींची उपस्थिती होती.
तळीरामांमुळे भांडण तंट्यात होतेय वाढ
जालना : शहरातील विविध भागात विशेषत: ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूविक्री जोमात सुरू आहे. अनेक तळीराम मद्यप्राषण करून चौकात, गल्ल्यांमध्ये भांडण तंटे करीत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
२६० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी
भोकरदन : तालुक्यातील मोहळाई येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात २६० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजूंना औषधोपचार करण्यात आले. यावेळी डॉ. प्रभाकर काळे, डॉ. गायकवाड, डॉ. वृषाली गिरणारे, डॉ. श्रद्धा देशमुख, डॉ. विशाल बावस्कर, डॉ. कृष्णा पालकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
जालना : थकीत वीज बिलासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून, फळबागांनाही मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.