शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीचे क्रॉपसॅप ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान

By admin | Updated: August 13, 2014 00:48 IST

जालना : कृषी विभागाच्या जालना उपविभागातंर्गत चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकावरील रोग टाळण्यासाठी क्रॉप सॅप ( कीड व रोग सर्वेक्षण नियंत्रक)

जालना : कृषी विभागाच्या जालना उपविभागातंर्गत चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकावरील रोग टाळण्यासाठी क्रॉप सॅप ( कीड व रोग सर्वेक्षण नियंत्रक) यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या योजनेतून उपविभागातील २० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकाच वेळी माहिती देण्यात येत आहे.पावसाची अनियमितता व खंडवृष्टी तसेच हवामानातील चढ उतारामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. हा रोगांचा प्रादुर्भाव उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार परिपूर्ण माहिती देण्याचे काम ही योजना करीत आहे. जालना उपविभागातील जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या चार तालुक्यांत १६ कीडरोग सर्वेक्षक आहेत. १२ हजार हेक्टरसाठी एक सर्वेक्षक यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. साधारणपणे एका तालुक्यातील ४८ हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिकांचे सर्वेक्षक रोगाचे सर्वेक्षण करतात. त्याचे नमुने तसेच माहिती जालना उपविभागीय कार्यालयात पाठविली जाते. ही माहिती आॅनलाईन पद्धतीने विद्यापीठ तसेच वरिष्ठ पातळीवर पाठविली जाते. रोगाचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना कोणती औषधी फवारावी याची माहिती दिली. एसएमएसच्या माध्यमातून संबंधित परिसरातील शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर दिली जाते. पिकांवर रोग पडला तरी शेतकऱ्यांना त्याचा तात्काळ अटकाव करता येतो. उपविभागासाठी जी. एच. कच्छवे, व्ही.एस.वाघमारे यांची कीड रोग नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याविषयी अधिक माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर. देशमुख म्हणाले की, क्रॉपसॅप शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना आहे. पिकावर किडरोग वाढण्याच्या आतच शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर तात्काळ मााहिती दिली जाते. आज रोजी काही भागात सोयाबीनवर ऊंट अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी लिंबोळी अर्क फवारण्याच्या सूचना शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे देण्यात आल्या आहेत. चार तालुक्यांत एकूण १८ कर्मचाऱ्यांकडून पीक परिस्थितीचा आढावा घेऊन दर आठवड्याला २० हजार शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. प्रत्येक शेतकऱ्याकडे जाणे कृषी विभागाला शक्य नाही. क्रॉपसॅपमुळे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती मिळत आहे. परिणामी कीडरोग नियंत्रणात राहत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत मिळते. (प्रतिनिधी)