शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

पालिकेला दिला अ‍ॅक्शन प्लॅन !

By admin | Updated: June 19, 2014 00:23 IST

जालना : नगरपालिकेतील विविध सोळा विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी पालिकेला अ‍ॅक्शन प्लॅन दिला.

जालना : नगरपालिकेतील विविध सोळा विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी पालिकेला अ‍ॅक्शन प्लॅन दिला. नॉनस्टॉप सात तास चाललेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत यासह अन्य विभागांमधील कामांमध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टिने काही कामांच्या पद्धतीत बदल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी नायक यांचे नगरपालिकेत आगमन झाले. सुरूवातीला पालिकेच्या प्रांगणात नायक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर १०.५० वाजेपासून जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले. यावेळी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती होती. प्रत्येक विभागप्रमुख आणि त्यांचे सहकारी याप्रमाणे सोळा विभागांची बैठक घेण्यात आली. दुपारी ३ वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ मिनिटांचा कालावधी जेवणासाठी देण्यात आला. या काळात जिल्हाधिकारी नायक यांनी नाश्ता घेतला. त्यानंतर पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले. सायंकाळी ५.३० वाजता बैठक संपली.विशेष म्हणजे आज नगरपालिकेत जवळपास सर्व अधिकारी, कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित होते. पालिकेत बंद पडलेली बायोमॅट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नायक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी कचरा डेपोचीही पाहणी केली. (पान दोनवर)थकबाकीदारांची नावे जाहीर करणारशहरात मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे ८७ ब्लॉकस् आहेत. थकीत रक्कमेनुसार थकबाकीदारांची यादी करून ती वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यात येणार आहे. थकबाकीदार कोणीही असो, त्यांची नावे जाहीर होतील. पालिकेच्या पथकांकडून जप्तीची कारवाईदेखील केली जाणार आहे. थकबाकीदारांची यादी जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरदेखील सर्वांना पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविणारशहरात १४३ ठिकाणी अतिक्रमणे आहेत. ती हटविण्यासाठी नगरपालिका, पोलिस, महसूल, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संयुक्त पथकाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत, याचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जाग तसेच इतर मालमत्तांवर त्या जागेच्या मालकीचा फलक लावण्यात येणार आहे.सफाईचा नवा फंडाशहरात पालिकेचे स्वच्छतेसाठी सहा झोन पाडण्यात आलेले आहेत. सफाई कामगारांची संख्या सुमारे अडीचशे आहे. या सर्व कामगारांनी आठवड्यातून एक दिवस किमान दोन झोनमधील संपूर्ण सफाई करावी, या कामाला मोहीम म्हणून न राबविता, हीच पद्धत नेहमीसाठी ठेवावी, विभागप्रमुखांनी या सर्व कामांवर नियंत्रण ठेवावे, कचरा जाळण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.शहर करणार हागणदारीमुक्तशहरात किती कुटुंबियांकडे शौचालये आहेत, याचे सवेक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात शौचालये नाहीत, तेथे सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याचा विचार आहे. टप्प्याटप्प्याने शहर हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. पालिकेत सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. जायकवाडीतून ५४ एमएलडी पाणीजायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे पाणी नागरिकांना वेळेवर मिळावे, यासाठी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून ते ‘एसएमएस’ द्वारे नागरिकांना कळविण्यात येणार आहे. जायकवाडीतून ५४ एमएलडी पाणी दररोज मिळावे, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेचे जलाशय शोधून त्यांचा मालकी हक्क निश्चित केला जाणार आहे. त्यासाठी नगरभूमापन विभागाचीही बैठक घेण्यात येईल. घरपोच देणार जन्मप्रमाणपत्रनगरपालिकेअंतर्गत २२ अंगणवाड्या आहेत. तेथील अंगणवाडी सेविकांमार्फत नवजात मुलामुलींचे जन्म प्रमाणपत्र यापुढे घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जन्म प्रमाणपत्रांसह पालिकेशी संबंधित लोकांना आवश्यक त्या सूचना एसएमएसद्वारे करण्याची पद्धतही अवलंबविली जाणार आहे.