शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत वयोवृृद्ध जपानी महिलेचे निधन

By admin | Updated: April 2, 2015 02:49 IST

जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला मिसाओ ओकावा यांचे बुधवारी जपानमध्ये निधन झाले. गेल्या महिन्यातच त्यांचा ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता

तोक्यो : जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला मिसाओ ओकावा यांचे बुधवारी जपानमध्ये निधन झाले. गेल्या महिन्यातच त्यांचा ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ओसाका येथील नर्सिंग होममध्ये सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओकावा यांचा जन्म ५ मार्च १८९८ रोजी झाला होता. १९ व्या शतकामध्ये जन्मलेल्या व २१ व्या शतकात हयात असलेल्या म्हणजेच दोन सहस्रके उलटताना पाहणाऱ्या मोजक्या व्यक्तींत ओकावा यांचा समावेश होता. ओकावा यांचा जन्म ५ मार्च १८९८ रोजी झाला होता. त्यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी अमेरिकी राईट बंधूंनी जगातील पहिले विमान उडविले होते. त्या किशोरवयीन असताना पहिल्या महायुद्धास तोंड फुटले होते, तर त्या सत्तरीत पोहोचल्यानंतर मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. ओकावा ११४ वर्षांच्या झाल्यानंतर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वाधिक वयाची जिवंत व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. जपानमधील नागरिक दीर्घायुषी असतात. जपानमधील साकारी मोमोई यांनीही शंभरी पार केली आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी ११२ वा वाढदिवस साजरा केला. ओकावा यांच्यानंतर अमेरिकेतील गरट्रूड वेव्हर हे जगातील सर्वाधिक वयाचे जिवंत व्यक्ती मानले जातात. त्यांचे वय ११६ वर्षे आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या वाढदिवसचे राष्ट्रीय वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कमीत कमी आठ तास झोप आणि आवडता सुशी आहार हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे तीन अपत्ये, चार नातू व सहा पणतू असलेल्या ओकावा यांनी तेव्हा सांगितले होते.