शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

By admin | Updated: April 7, 2015 03:50 IST

कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक

वॉशिंग्टन : कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक आरोग्य संघटनेने कीटकजन्य अन्नपदार्थांच्या सेवनाने २०१० मध्ये सुमारे तीन लाख ५१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आज ७ एप्रिलपासून शेतापासून ताटापर्यंत हे आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे.असुरक्षित अन्नपदार्थ, उदाहरणार्थ न शिजलेले जेवण सेवन करणे म्हणजे २०० आजारांना आमंत्रणच आहे. जुलाबापासून कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे. आधुनिक पद्धतीने अन्न उत्पादनामुळेही प्राणघातक किटाणूंचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असुरक्षित अन्नपदार्थांत प्राणघातक जिवाणू, विषाणू, परोपजीवी किंवा रसायने असतात. न शिजवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळे यात विष्ठा आणि जलचर प्राणी यात सागरी जैव विष असते. आगामी काळात असे अन्नपदार्थ असलेले एखादे प्लेटही धोक्याचे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आपल्या पहिल्या अहवालात संघटनेने ‘स्थानिक अन्न समस्या ही आता तात्काळ जागतिक आणीबाणीमध्ये रूपांतरित’ होत असल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग यांनी म्हटले की, ‘अन्न उत्पादनाचे औद्योगिकीकरण होत असून त्यांचा व्यापार आणि वितरणही वैश्विक झाले आहे. या बदलांमुळे अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने यांचे जागतिक पातळीवर वहन होणे सोयीचे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)