शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिद्ध ‘अफगाण गर्ल’ला अटक

By admin | Updated: October 27, 2016 02:32 IST

‘नॅशनल जिओग्राफिक’ या ख्यातकीर्त नियतकालिकाने ३० वर्षांपूर्वी मुखपृष्ठावर छायाचित्र छापल्याने, सोविएत संघाने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या

पेशावर : ‘नॅशनल जिओग्राफिक’ या ख्यातकीर्त नियतकालिकाने ३० वर्षांपूर्वी मुखपृष्ठावर छायाचित्र छापल्याने, सोविएत संघाने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या लाखो निर्वासितांची ओळख ठरलेल्या आणि हिरव्या, भेदक डोळ्यांमुळे ‘ मोनालिसा आॅफ अफगाणिस्तान’ म्हणून जगभर प्रसिध्दी पावलेल्या शरबत बिवी ऊर्फ शरबत गुला या महिलेस पाकिस्तान सरकारने फसवणूक व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक केली.बनावट दस्तावेजांच्या आधारे पाकिस्तानी नागरिकत्वाचे ओळखपत्र मिळविल्याच्या गुन्ह्याबद्दल पाकिस्तानच्या संघीय तपास यंत्रणेने (एफआयए) शरबत बिवीला पेशावर शहराच्या नोथिया भागातील तिच्या राहत्या घरातून अटक केली. गुन्हा सिद्ध झाल्यास तिला १४ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास व दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. राष्ट्रीय संगणकीकृत ओळखपत्र देण्याचे काम करणाऱ्या ‘नॅशनल डेटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अ‍ॅथॉरिटी’ने (एनडीआरए) केलेल्या फिर्यादीवरून दोन वर्षे तपास केल्यानंतर तपास यंत्रणेने ही कारवाई केली. शरबत बिवीकडे पाकिस्तान आणि अफगाण या दोन्ही देशांची नागरिक ओळखपत्रे मिळाली. ती जप्त करण्यात आली. (वृत्तसंस्था)फोटो जगभर गाजला... तालिबानींच्या बंदुकांना न जुमानता स्वत: शिक्षण घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी मलाला नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यावर अफगाणिस्तानची ओळख म्हणून जगापुढे येण्याआधी शरबत गुला ही जगाला परिचित झाली. ‘नॅशनल जिओग्राफिक’चे छायाचित्रकार स्टिव्ह मॅक्करी यांनी १९८४ मध्ये शरबत गुलाचे छायाचित्र घेतले तेव्हा ती अवघी १२ वर्षांची होती व पेशावर शहराच्या वेशीवर अफगाण निर्वासितांच्या छावणीत राहात होती.