शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तीन फूट लांबीच्या सापाने महिलेची उडाली झोप

By admin | Updated: March 15, 2017 00:48 IST

टेनेसीतील चिथॅम काऊंटीत राहणाऱ्या ख्रिस्तीन हम्पश्रिज यांच्या अंथरुणात गुरुवारी रात्री तीन फूट लांबीचा साप निघाला. त्यांनी सांगितले की आधी मला कोचवरच झोप लागली होती.

टेनेसीतील चिथॅम काऊंटीत राहणाऱ्या ख्रिस्तीन हम्पश्रिज यांच्या अंथरुणात गुरुवारी रात्री तीन फूट लांबीचा साप निघाला. त्यांनी सांगितले की आधी मला कोचवरच झोप लागली होती. नंतर थोडी रात्र झाल्यावर मी बेडरूममध्ये झोपले. रात्री दोन वाजता मला जाग आली त्यावेळी मला असे वाटले की माझी मांजरच माझ्या हाताला स्पर्श करीत आहे. परंतु काही क्षणांतच मला झालेला स्पर्श हा मांजरीच्या केसांचा नाही, असे हम्पश्रिज यांनी डब्ल्यूटीव्हीएफ-टीव्हीला सांगितले. मी आणखी निरखून बघितले. हात न हलवता मी डोके वर केले. अंथरुणात जे काही होते त्याचे डोके लहान होते. मी बॅटरी घेतली व बघितले तेव्हा मांजर नसून तब्बल तीन फूट लांब साप होता. मी किंचाळून खालच्या खोलीत असलेल्या माझ्या मुलीला आवाज दिला. माझ्या घरी कधीही सापच काय पण उंदीरही निघालेला नसल्यामुळे मला खूपच धक्का बसला होता, असे हॅम्पश्रिज म्हणाल्या. हा साप बिनविषारी होता व चिथॅम काऊंटीच्या महापौरांच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. हा साप बेसमेंटमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यातून घरात आला असावा, असे हॅम्पश्रिज यांना वाटते. साप माझ्या अंथरुणात माझ्या अंगावर दिसताच मी भयंकर घाबरले. अशा अनैसर्गिक परिस्थितीत घाबरून जाणारी मी काही पहिलीच व्यक्ती नाही, असे ख्रिस्तीन हॅम्पश्रिज यांनी फेसबुकवर लिहिले.