शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजचा क्रिकेटर सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात सहभागी

By admin | Updated: March 13, 2017 10:51 IST

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानच्या लष्करात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली आहे.

ऑनलाइन लोकमतलाहोर, दि. 13 - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानच्या लष्करात सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली आहे. पाकिस्तानी सुपर लीग म्हणजेच पीएसएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी तो पाकिस्तानात आला असताना त्यानं ही इच्छा बोलून दाखवली. पीएसएलमध्ये मार्लन सॅम्युअल्स हा पेशावर जाल्मी संघाचं प्रतिनिधत्व करतो. लाहोरमध्ये याच संघाने पीएसएलचं विजेतेपद मिळवलं आहे. या टीमचे मालक जावेद आफ्रिदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, यात मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानी लष्करात सामील होण्याची इच्छा बोलून दाखवतो आहे. पेशावर जाल्मी संघाने पीएसएलचं जेतेपद पटकावल्यानंतर पाकिस्तानीचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी विजयी ठरलेल्या संघाची भेट घेतली. त्या भेटीनंतर वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल्सने त्यांचं कौतुक केलं आहे. सॅम्युअल्स म्हणाला, पाकिस्तानात क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. इथल्या लोकांच्या चेह-यावर या सामन्यामुळे समाधान पाहायला मिळालं. मी मनानं आणि हृदयानं पाकिस्तानी आहे. त्यामुळे पाकिस्तानात खेळण्यास मिळाल्याचा मला आनंद आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांना उद्देशून सॅम्युअल्स म्हणाला, जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी वाट पाहेन. मला पाकिस्तानी लष्कराचा एक भाग बनायचं आहे. मी मरेपर्यंत पाकिस्तानच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर पेलायला तयार आहे. त्यानंतर आफ्रिदी म्हणाले, तुमच्या या सोनेरी शब्दांमुळे पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असल्याचं जगाला समजेल. तू हृदयाचा विजेता आहेस. मात्र सॅम्युअल्सचं पाकिस्तानबाबत अचानक उफाळून आलेलं प्रेम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.