शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीसचे भवितव्य ठरविणाऱ्या सार्वमतासाठी मतदान

By admin | Updated: July 5, 2015 23:08 IST

ग्रीसमध्ये अटीतटीच्या वातावरणात सार्वमतासाठी मतदान घेण्यात आले असून, या मतदानाच्या निकालातून ग्रीकचे युरोझोनमधील भवितव्य ठरणार आहे असे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी म्हटले आहे.

अथेन्स : ग्रीसमध्ये अटीतटीच्या वातावरणात सार्वमतासाठी मतदान घेण्यात आले असून, या मतदानाच्या निकालातून ग्रीकचे युरोझोनमधील भवितव्य ठरणार आहे असे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी म्हटले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला ग्रीस या आर्थिक संकटात कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांची जगण्याची इच्छा, निर्धारपूर्वक जीवन जगण्याची इच्छा, तसेच देशाचे भवितव्य हाती घेणे कोणीही डावलू शकत नाही, असे सिप्रास म्हणाले. पांढराशुभ्र शर्ट घालून स्वत:चे मतदान करण्यासाठी आलेले सिप्रास मोकळे दिसत होते. ११ दशलक्ष ग्रीस नागरिकांना मतदान करण्यासाठी संपूर्ण देशात मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एजियन बेटापासून ते उत्तरेकडील बल्गेरियाच्या सीमेवरील गावापर्यंत ही मतदान केंद्रे आहेत. आंतरराष्ट्रीय दात्यांकडून आणखी निधी मिळवण्यासाठी कडक काटकसरीचे जीवनमान स्वीकारायचे काय? या प्रश्नाचे उत्तर मतांच्या माध्यमातून ग्रीकच्या नागरिकांना द्यायचे आहे. युरोपियन युनियन व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अगदी बारकाईने या सार्वमतावर लक्ष ठेवून आहेत. सार्वमताचा निकाल नाही असा लागल्यास सरकार अधिक बळकट होईल. आंतरराष्ट्रीय कर्जदारांना थोडे कर्ज माफ करण्यास सांगू व काटकसरीचे उपाय बंद करू. काटकसर धोरणामुळे ग्रीसची अर्थव्यवस्था मंदीखाली गेली असून कोसळण्याच्या बेतात आहे. पण या सार्वमतातून हो किंवा नाही असा निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे.> या सार्वमतातून नकारात्मक निर्णय झाल्यास ग्रीसला १९ देशांच्या युरोझोन संघटनेतून बाहेर पडावे लागणार आहे; पण पंतप्रधान सिप्रास यांच्या मते ग्रीक नागरिक प्रतिष्ठेने जगण्यासाठी मतदान करत असून लोकशाही युरोपमध्ये सोमवारी नवा अध्याय सुरू होईल.