शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून व्हॉट्सअॅपला 21 कोटींचा दंड

By admin | Updated: May 14, 2017 15:05 IST

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला तब्बल 3 दशलक्ष युरो (सुमारे 21 कोटी रुपये) इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

रोम, दि. 14 - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला इटलीमध्ये तब्बल 3 दशलक्ष युरो (सुमारे 21 कोटी रुपये) इतका दंड ठोठावण्यात आला आहे. यूजर्सची खासगी माहिती परवानगीविना फेसबुकसोबत शेअर केल्याने  व्हॉट्सअॅपला हा दंड ठोठावण्यात आला आहे. 
 
गेल्या वर्षी युरोपीय संघाच्या 28 सदस्यीय समितीने यूजर्सची खासगी माहिती फेसबुकसोबत शेअर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. या अटीचं उल्लंघन करणं व्हॉट्सअॅपला चांगलंच महागात पडलं असून कंपनीला 21 कोटी रूपये भरावे लागणार आहेत.
 
मार्क झुकरबर्गच्या फेसबुकनं 2014 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅप यापुढेही स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम करेल आणि युजर्सच्या परवानगीशिवाय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमध्ये माहिती शेअर होणार नाही असं कंपनीकडून सांगिण्यात आलं होतं. परंतु, 2016 मध्ये अचानक कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी बदलली.  "डेटा शेअरिंग"ला संमती न दिल्यास यूजर्सना व्हॉट्स अॅपचा वापरच करता येत नव्हता. त्यामुळे यूजर्सच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. 
 
"डेटा शेअरिंग"ला भारतासह अनेक देशांतून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. भारताच्या सर्वोच्च् न्यायालयात या प्रखऱणी एक याचिकाही टाकण्यात आली असून याप्रकरणी कडक कायदा बनवण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं सरकारकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे.