शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प

By admin | Updated: March 21, 2017 18:51 IST

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाहीये

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाहीये. रांची कसोटीनंतर ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आहे. 28 वर्षीय भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प आहे असे एका लेखात म्हणत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी मीडियाला विराट कोहली नेहमीच जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या वादग्रस्त लेखानंतर विराट कोहलीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रीडा समीक्षक हर्षा भोगले, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाच्या मीडियावर टीका करत खंत व्यक्त केली आहे. 'द डेली टेलिग्राफ'च्या एका लेखामध्ये विराट कोहली जागतिक खेळातील डोनाल्ड ट्रम्प आहे. अमिरेकेचे राष्ट्रपती ट्रम्पप्रमाणे चुका दाखवल्यास विराट कोहली माध्यमांना दोष देतो. यापूर्वीही, 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. दुसऱ्या कोसाटीनंतर कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात अंपायरच्या रूममध्ये गेला आणि आउट का दिलं याबाबत स्पष्टीकरण मागितलं, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांवर स्पॉर्ट्स ड्रिंकची बाटली फेकली, त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप टेलीग्राफने केला आहे.  भारत-ऑस्ट्रेलियातील चार कसोटी सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत असून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येते खेळला जाणार आहे.