शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अ‍ॅस्ट्रोसॅटची वर्षअखेरीस अवकाश झेप

By admin | Updated: May 20, 2015 02:19 IST

अवकाशीय वस्तूंच्या अभ्यासासाठी समर्पित पहिल्या खगोलीय मिशनअंतर्गत प्रक्षेपित केला जाणारा अ‍ॅस्ट्रोसॅट हा उपग्रह अवकाशात झेपावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला

नवी दिल्ली : अवकाशीय वस्तूंच्या अभ्यासासाठी समर्पित पहिल्या खगोलीय मिशनअंतर्गत प्रक्षेपित केला जाणारा अ‍ॅस्ट्रोसॅट हा उपग्रह अवकाशात झेपावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून, त्याच्या सर्व प्रणालींचा अभ्यास केला जात आहे. या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात हा उपग्रह अवकाशात झेपावेल.पीएसएलव्ही पेलोड लावल्यानंतर या उपग्रहाची तांत्रिक योग्यता तपासण्याचे काम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती इस्रोच्या वेबसाईटवर दिली आहे. पीएसएलव्ही, सी-३४ प्रक्षेपकाद्वारे तो पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. तो ६५० कि.मी. उंचीवर भूमध्यरेखीय कक्षेजवळ स्थिरावेल. गेल्या आठवड्यात उपग्रहाला पूर्णपणे संकलित केल्यानंतर सर्व परिमाणे अचूकरीत्या काम करीत आहेत. (वृत्तसंस्था) येत्या काही दिवसांत प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावर नेण्यापूर्वी विद्युत चुंबकीय अडसर, विद्युत चुंबकीय योग्यता, औष्णिक पोकळी, कंपन, आवाजाशी संबंधित चाचण्या पार पाडल्या जातील. अल्ट्राव्हायोलेट, आॅप्टिकल, निम्न आणि उच्च ऊर्जा एक्स-रे व्हेवबँडवर एकाचवेळी निरीक्षण करण्याची या उपग्रहाची क्षमता असल्याचे इस्रोने म्हटले आहे. ४अ‍ॅस्ट्रोसॅट ही इस्रोची पहिली अंतराळ वेधशाळा असेल. या उपग्रहाच्या सर्व यंत्रणा सुरळीतरीत्या काम करीत असून सर्व उपकरणे आणि सहायकप्रणाली व्यवस्थितरीत्या काम करीत आहे. येत्या काही दिवसांत प्रक्षेपणासंबंधी सर्व चाचण्या पूर्ण केल्या जातील. या उपग्रहावर चार एक्स-रे मशीन, अल्ट्राव्हायोलेट दुर्बीण, एक चार्ज पार्टिकल मॉनिटर लावला आहे.४इस्रोसह टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च, भारतीय खगोलभौतिकी संस्था, खगोल आणि खगोलभौतिकी आंतरविद्यापीठ केंद्र तसेच रमण संशोधन संस्थेनेही या उपग्रहाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. कॅनडाची अंतराळ संस्था आणि ब्रिटनच्या लिसेस्टर विद्यापीठाच्या मदतीने दोन उपकरणे तयार करण्यात आली आहेत.