शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग निदर्शनामागे अमेरिकेचा हात

By admin | Updated: October 12, 2014 02:15 IST

हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी सुरू असलेल्या निदर्शनामागे अमेरिकेचा हात असल्याचा स्पष्ट आरोप चीनने केला आहे.

बीजिंग :  हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी सुरू असलेल्या निदर्शनामागे अमेरिकेचा हात असल्याचा स्पष्ट आरोप चीनने केला आहे. तिबेटी आणि शिनजियांगच्या फुटीरवादी चळवळीशी संबंधित अमेरिकी अधिका:याने आंदोलक नेत्याची भेट घेतली होती, असा दावा करीत हे आंदोलन अमेरिका अत्यंत कुशलतेने हाताळत असल्याचा आरोप चीनने केला आहे.
चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या पीपल्स डेली ऑनलाईनने माध्यमातील वृत्ताच्या आधारे यावर व्यापक भाष्य केले आहे. त्यात म्हटले आहे की, नॅशनल इन्डोव्हमेन्ट फॉर डेमोक्रॅसी ऑफ द यूएसच्या (एनईडी) संचालक लुईसा ग्रीव्ह यांनी काही महिन्यांपूर्वी या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी या आंदोलनाशी संबंधित लोकांची भेट घेतली होती. ग्रीव्ह एनईडीच्या व्हाईस प्रेसिडेन्ट असून त्यांच्याकडे आशिया, मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेची जबाबदारी आहे.
गेल्या अनेक वर्षापासून तिबेट स्वातंत्र्य, अन्य विभागातील लोकशाही चळवळ तसेच चीन सरकारमधील हस्तक्षेपाबाबत त्यांचे नाव घेतले जात होते, असेही यात म्हटले आहे. अमेरिका लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि इतर मूल्यांच्या आडून अमेरिका अशा कृत्याचे समर्थन करीत आले आहे, असा आरोप आहे.
 
निदर्शकांचा ठिय्या
सरकारने लोकशाहीवादी नेत्यांशी होणारी प्रस्तावित बोलणी रद्द केल्याने हाँगकाँगमधील निदर्शनाची तीव्रता वाढली आहे. मोठय़ा संख्येने निदर्शक शहराच्या मुख्य भागात ठिय्या देऊन     आहेत. माघार न घेण्याचा आंदोलकांनी निर्धार केल्याने हाँगकाँग सरकारने ही प्रस्तावित बोलणी रद्द  केली.