शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

US ELECTION - हिलरी की ट्रम्प?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 05:48 IST

महासत्तेची सूत्रे महिलेच्या हाती जाऊन इतिहास घडणार की, राजकारणातील नवख्या व्यक्तीचे पारडे जड ठरणार याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून

वॉशिंग्टन/न्यू यॉर्क : महासत्तेची सूत्रे महिलेच्या हाती जाऊन इतिहास घडणार की, राजकारणातील नवख्या व्यक्तीचे पारडे जड ठरणार याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, संपूर्ण जगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोट्यवधी अमेरिकी नागरिकांनी ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी मतदान केले. डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा पहिला निकाल पहाटे ५ वाजता हाती येईल. लोकशाहीची जननी असलेल्या अमेरिकेत प्रचाराची पातळी यंदा प्रथमच न भुतो एवढ्या खालच्या पातळीला घसरली होती. 

शेवटच्या क्षणांत हिलरी आणि ट्रम्प यांनी एकेका मतासाठी अमेरिकी जनतेसमोर जोरदार वादविवाद केला. हिलरी यांनी त्यांचे पती बिल क्लिंटन यांच्यासोबत न्यू यॉर्कच्या चाप्पाकुआ भागातील एका प्राथमिक विद्यालयात मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर पडताना त्या म्हणाल्या की, मी आनंदी आहे, अत्याधिक आनंदी आहे. त्यांनी मतदान केंद्रावरील लोकांशी हस्तांदोलन केले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी ‘मॅडम प्रेसिडेंंट’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सोमवारी रात्री नॉर्थ कॅरोलिना येथे विशाल मेळाव्याला की, मी आनंदी आहे, अत्याधिक आनंदी आहे. त्यांनी मतदान केंद्रावरील लोकांशी हस्तांदोलन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ‘मॅडम प्रेसिडेंंट’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सोमवारी रात्री नॉर्थ कॅरोलिना येथे विशाल मेळाव्याला हिलरींनी संबोधित केले. या मेळाव्यात पॉप गायिका लेडी गागाने उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बहारदार कार्यक्रम सादर केला. दुसरीकडे ट्रम्प यांची शेवटची प्रचार सभा मिशिगन येथे झाली. दोन्ही मेळावे रात्री एक वाजता संपले आणि अशा प्रकारे ईस्ट कोस्टमध्ये मतदान केंद्र उघडण्याच्या सहा तास आधी प्रचाराची रणधुमाळी थांबली. हिलरी यांनी डिक्सविले नोच भागात मध्यरात्रीनंतर पहिला विजय मिळवताना ट्रम्प यांच्या दोन मतांच्या तुलनेत चार मते प्राप्त केली. 

देशाचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी शेकडो काँग्रेस सदस्य, प्रांतिक विधानसभांचे सदस्य, स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांशिवाय जवळपास २० कोटी लोक पात्र मतदार आहेत. अमेरिकी निवडणूक प्रणालीच्या आधीच मतदान करण्याच्या तरतुदीचा वापर करीत विक्रमी ४ कोटी २० लाख लोकांनी आधीच मतदान केले आहे. २०१२ मध्ये ३.२३ कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसापूर्वीच मतदान केले होते.