शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कस्तानने रशियाचे विमान पाडले

By admin | Updated: November 25, 2015 00:17 IST

नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कस्तानने मंगळवारी सीरियन सीमेवर रशियाचे लढाऊ विमान पाडले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याचे

अंकारा : नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कस्तानने मंगळवारी सीरियन सीमेवर रशियाचे लढाऊ विमान पाडले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य संबोधल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव उफाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तुर्की, रशिया हे दोन्ही देश सीरिया यादवीतील महत्त्वाची पात्रे आहेत. रशियन लढाऊ विमानाने सीरियन हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्याला पाच मिनिटांत दहा इशारे देण्यात आले. मात्र, वैमानिकाने इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने दोन तुर्किश एफ-१६ विमानांनी ते पाडले, असे तुर्किश लष्कराने सांगितले. विमान सीरियाच्या हद्दीत होते असे जोर देऊन सांगत रशियाने ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केल्याने दोन्ही देशांत मोठा राजकीय पेच निर्माण होण्याचा धोका आहे. विमानात दोन वैमानिक होते. ते जीवंत आहेत. विमान कोसळल्यानंतर ते पॅराशूटद्वारे खाली उतरले. एका वैमानिकाला विरोधी दलांनी पकडले, असे तुर्किश अधिकाऱ्याने सांगितले.तथापि, सीरियातील विरोधी सूत्रांच्या माहितीनुसार, एक वैमानिक ठार झाला, तर दुसरा बेपत्ता आहे. तुर्किश एफ-१६ विमानांनी हल्ला केल्यानंतर रशियन विमानाचा आकाशातच स्फोट होऊन ते सीमेच्या सीरियन बाजूकडील पर्वतात कोसळले. सीरियाच्या आकाशात रशियासह अमेरिका, फ्रान्स, तुर्की आणि आखाती देशांच्या विमानांची सदोदित उपस्थिती असते. यातून नको ती घटना घडून मोठा मुत्सद्दी आणि लष्करी पेच निर्माण होण्याची शंका दीर्घकाळापासून व्यक्त करण्यात येत होती. या घटनेने ती खरी ठरली. एसयू-२४ या रशियन विमानाने तुर्कीच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. इशारे देऊनही फरक पडला नाही. त्यामुळे हे विमान पाडण्यात आले, असे तुर्किश राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. तुर्कीने अंकारातील रशियन राजदूताला पाचारण केले आहे. रशियन विमानाने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याबद्दल तुर्की रशियन राजदूताकडे निषेध नोंदविला.णार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियाने आपले विमान पाडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, हे विमान लढाऊ विमानांद्वारे नाही, तर जमिनीवरून मारा करून पाडण्यात आल्याचे म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी या घटनेला पाठीत खंजीर खुपसण्याची कृती संबोधून गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे. विमान पाडणारे ‘दहशतवाद्यांचे साथीदार’ असल्याचे त्यांनी संबोधले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह उद्या तुकस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते. पण एक दिवस अगोदरच ही घटना घडल्याने त्यांनी त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द केला आहे.