मिलान : इटलीतील मिलान येथे एका सिंहावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या किडनीतून रोबोने ट्यूमर काढला आहे. लिओनार्दो असे या सिंहाचे नाव असून, तो आठ वर्षांचा आहे. मिलान येथील लोदी व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये सिंहावर रोबोच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्राण्यावर रोबोच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. टेलएपी एएलएफ एक्स सर्जिकल रोबोच्या साहाय्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आॅपरेशननंतर तीन तासांत सिंह चालू-फिरू लागला. हा सिंह आता पूर्ण बरा झाला असून, लांघो मुराजानी सफारी पार्क मध्ये नेहमीप्रमाणे फिरत आहे. लिओनार्दोला रक्तस्राव होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या किडनीत ट्यूमर असल्याचे निदान सिटीस्कॅननंतर करण्यात आले. सिंहाच्या किडनीत ट्यूमर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोदी हॉस्पिटलच्या अनस्थेशिया विभागाने प्रथम सिंहावर ओपन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता; पण नंतर ओपन सर्जरीत सिंहाला धोका असल्याचे लक्षात घेऊन रोबोटिक सर्जरी करण्यात आली. टेलएपी एएलएफ एक्स सर्जिकल रोबो म्हणजे एक रोबोटिक हात असून त्यावर रिमोटच्या साहाय्याने नियंत्रण ठेवता येते. त्या खास सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. मिलान येथील लोदी व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये सिंहावर रोबोच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.लिओनार्दो या सिंहाच्या किडनीत ट्यूमर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोदी हॉस्पिटलच्या अनस्थेशिया विभागाने प्रथम सिंहावर ओपन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता; पण नंतर ओपन सर्जरीत सिंहाला धोका असल्याचे लक्षात घेऊन रोबोटिक सर्जरी करण्यात आली.
रोबोने काढले सिंहाच्या किडनीतून ट्युमर
By admin | Updated: May 23, 2015 01:06 IST