शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 02:48 IST

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

लास वेगास : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मायकेल सँडफोर्ड असे त्याचे नाव असून, नेवाडा येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मायस्टर थिएटरमधील सभेदरम्यान मायकेलने पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचे हे प्रयत्न पोलिसांनी उधळून लावले. ट्रम्प यांना ठार करण्यासाठी आपण कॅलिफोर्नियाहून येथे आलो असल्याचे त्याने सांगितले. मायकेल गेल्या दीड वर्षापासून ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्याने बंदूक चालविलेली नाही. ऐनवेळी गोळी चालविताना गफलत होऊ नये म्हणून घटनेच्या एक दिवस आधी त्याने येथील फायरिंग रेंजवर जाऊन सराव केल्याचेही तपासात समोर आले. लास वेगास येथील प्रयत्न अयशस्वी झाल्यास नंतरच्या सभेत ट्रम्प यांना मारण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने ट्रम्प यांच्या फिनिक्स येथील सभेची तिकिटे खरेदी केली होती. मायकेल दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षांचा कारावास होऊ शकतो. आपण एक किंवा दोन फेरी झाडू शकलो असतो आणि असा प्रयत्न करताच पोलिसांच्या हातून आपण मारलो गेलो असतो याची आपणास पूर्ण कल्पना असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. (वृत्तसंस्था)