शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:51 IST

इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिकार मर्यादित करणारा एक प्रतीकात्मक ठराव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने गुरुवारी संमत केला.

वॉशिंग्टन : इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिकार मर्यादित करणारा एक प्रतीकात्मक ठराव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने गुरुवारी संमत केला. या सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असून तिथे हा ठराव २२४ विरुद्ध १९४ मतांनी मंजूर झाला.अमेरिकेवर इराणने हल्ले चढविल्यास ती अपवादात्मक स्थिती वगळून त्या देशाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी सिनेटची मंजूरी घ्यायला हवी यासाठीही हा ठराव करण्यात आला आहे. इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्याद्वारे अमेरिकेने ठार मारले. त्यानंतर इराण व अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली.या सगळ्या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत खळबळ माजली आहे. मात्र इतके होऊनही अमेरिका व इराणने युद्ध पुकारलेले नाही. हाऊस आॅफ रिप्रेझेन्टेटिव्हजने ठराव जरी संमत केला असला तरी त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या व्हेटोच्या अधिकाराला धक्का लागणार नाही. अमेरिकेने युद्ध पुकारण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचे परीक्षण करण्याचा हक्क अमेरिकी काँग्रेसला १९७३च्या युद्धविषयक अधिकार कायद्यामुळे मिळाला आहे असे या ठरावात म्हटले आहे.इराणच्या जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करून अमेरिकेला सुरक्षित केले हा ट्रम्प यांचा दावा चुकीचा आहे अशी टीका डेमोक्रॅ्रटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पलोसी यांनी केली आहे. (वृत्तसंस्था)इराणच्या क्षेपणास्त्रानेच पडले विमान : जॉन्सनयुक्रेनचे विमान पाडल्याचा आरोप इराणने फेटाळून लावला आहे. तथापि, कॅनडा सरकारला आपली गोपनीय माहिती देण्याचे आवाहन केले आहे.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, हे विमान जाणूनबुजून पाडलेले नसू शकते; पण ते इराणच्या क्षेपणास्त्रानेच पडले आहे. या तपासात सहभागी होणार असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाने म्हटले आहे.न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही एका व्हिडिओची खातरजमा केली. यात एक वस्तू आकाशात उडताना दिसत आहे आणि त्यानंतर काही सेकंदात मोठा धमाका होतो.युक्रेनने संयुक्त राष्ट्रांकडे व्यापक चौकशीची मागणी केली आहे. युक्रेनचे ४५ विमानतज्ज्ञ आणि सुरक्षा अधिकारी तपासासाठी इराणला पोहोचले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिका