शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

स्नोडेनला दोषी ठरविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: May 31, 2014 05:54 IST

अमेरिकन सरकारने स्नोडेनचे एक ई-मेल प्रसिद्ध केले असून, त्याने मुलाखतीत केलेले दावे खोटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

वॉशिंग्टन : अमेरिकन सरकारने स्नोडेनचे एक ई-मेल प्रसिद्ध केले असून, त्याने मुलाखतीत केलेले दावे खोटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमेरिकेची राष्टÑीय तपास संस्था एनएसएकडून केल्या जाणार्‍या नागरिकांच्या हेरगिरीबाबत आपण ई-मेल पाठवून चिंता व्यक्त केली होती, असा स्नोडेनचा दावा होता. एनएसएच्या प्रमुखांना लिहिलेले हे ई-मेल आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्नोडेनने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला अमेरिकेच्या हेरगिरीची फार चिंता वाटत होती. या ई-मेलमध्ये तसे काहीच नसल्याचे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जे कार्ने यांनी म्हटले आहे. स्नोडेनने असे ई-मेल पाठविले नसल्याचे एनएसएने डिसेंबरमध्ये म्हटले होते; पण कसून चौकशी केल्यानंतर असे एक ई-मेल मिळाले, असे एनएसएने म्हटले आहे. ई-मेल प्रसिद्ध झाल्याचे कळताच आता सत्य बाहेर येईल, असे स्नोडेनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था) स्नोडेनने त्याला मिळालेली गोपनीय माहिती बाहेर फोडण्याऐवजी त्याने अमेरिका सरकारच्या संबंधित विभागाकडे यासंदर्भातील चिंता व्यक्त करायला हवी होती; पण स्नोडेनने आपण योग्य त्या मार्गाने गेलो, असा दावा केला आहे. स्नोडेनने एनबीसी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला घरी परतायचे आहे, असा दावा केला आहे; पण अमेरिकेत परतायचे असल्यास आपल्याला माफी वा दया मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.