शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

काही क्षणांत ३२ वर्षांची मेहनत मातीमोल

By admin | Updated: May 1, 2015 02:39 IST

३२ वर्षांच्या मेहनतीतून निर्माण केलेली स्वत:ची पाच मजली इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना हतबल होऊन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.

काठमांडू : ३२ वर्षांच्या मेहनतीतून निर्माण केलेली स्वत:ची पाच मजली इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना हतबल होऊन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. ही व्यथा आहे, मूळ राजस्थानी जैन कुटुंबातील असलेल्या आणि सध्या काठमांडूमध्ये स्थायिक झालेल्या प्रकाश दुग्गर यांची. या घटनेत त्यांच्या ४ कर्मचाऱ्यांचा जीव देखील गेला. दुग्गर यांनी काठमांडूमध्ये जम बसविला. पण भूकंप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. भूकंपानंतर आता त्यांच्याकडे कामाला असलेले सगळे कर्मचारी सध्या तात्पुरत्या तंबूंमध्ये वास्तव्याला आहेत. संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाल्यानंतरही कोणीही मदतीला न आल्याची खंत दुग्गर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. झोपणे, म्हणजे ‘धाडस’रात्र-रात्र जागून काढणे नेपाळमध्ये आता नित्याचेच बनले आहे. शनिवारच्या भूकंपानंतर आतापर्यंत तब्बल ६०० आफ्टर शॉक्सची नोंद भूकंपमापन यंत्रावर झाली आहे. त्यातील सुमारे १०० भूकंपाचे धक्के सगळ्याच नेपाळी नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या भीतीने सगळ्यांनाच ग्रासले आहे. पुन्हा एखादा मोठा धक्का बसेल आणि सगळेच संपेल, अशी भीती साऱ्यांना आहे.