शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तापमान कमी करण्यासाठी तातडीने करार करण्याची गरज

By admin | Updated: December 1, 2015 08:58 IST

जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पॅरिस : जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.संयुक्त राष्ट्रांनी येथे आयोजित केलेल्या जागतिक हवामान बदलावरील परिषदेसाठी भारताच्या पॅव्हेलियनचे उद््घाटन करताना मोदी यांनी जीवनशैलीत बदल केल्यास पृथ्वीवरील ओझे काहीसे कमी होईल, असे म्हटले. वाढलेले तापमान हे मोठे आव्हान आहे हे खरेच; परंतु ते आम्ही निर्माण केलेले नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. या परिषदेचे फलित काय हे खूप महत्त्वाचे आहे. जगाने तातडीने कृती करावी, असे आम्हाला वाटते. आमचे प्रयत्न किती टिकाऊ असतील हे आमचे विचार आणि कृती यावर अवलंबून असेल, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले, भारताचा विकास ही आमची नियती आणि आमच्या लोकांचा हक्क आहे तरीही आम्ही वाढत्या तापमानाशी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. पॅव्हेलियनमधील वेगवेगळ्या स्टॉल्सवर मोदी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह गेले. नंतर त्यांनी पर्यावरण संरक्षणावरील पुस्तकाचे प्रकाशन केले. जागतिक तापमान वाढल्याचा परिणाम हा हवामान बदलात झालेला आहे. तापमान वाढल्याचे वाईट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांची वाढलेली जोखीम, हवामानाच्या पद्धतीमध्ये झालेले बदल आणि नैसर्गिक संकटांची भीषणता, असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. ही परिषद भारताच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. विकसित देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी गरीब देशांना तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. या परिषदेच्या समाप्तीनंतर झालेला करार हा मानव व निसर्ग यांच्यात समतोल राखणारा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‘गरजा भागतील एवढी साधने आहेत; हावरटपणा नको, कोणीही निसर्गाच्या पुढे नाही’मोदी यांनी भाषणात ऋग्वेदातील क्षेत्रपती सुक्त आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा उल्लेख केला. या जगात प्रत्येकाच्या गरजा भागतील एवढी साधने आहेत; परंतु कोणाचाही हावरटपणा त्यातून पूर्ण होणार नाही, असे गांधी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या आवडीनिवडींना त्यांची संस्कृती आणि श्रद्धांमुळे आकार मिळतो. भारतात निसर्गाला आईचा दर्जा आहे. फार पुरातन काळापासून आम्ही मानवता हा निसर्गाचाच भाग असल्याचे व निसर्गाच्या वर नसल्याचे बघितले आहे. निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांत पावित्र्य असल्याचे मोदींनी सांगितले.