शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

थायलंड : राजकीय कोंडी फोडण्यात संसद अपयशी

By admin | Updated: May 17, 2014 22:46 IST

घटनापीठाने पंतप्रधान यिंगलक शिनवात्र यांना पदच्युत केल्याने थायलंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे.

बँकॉक :  हंगामी पंतप्रधान नियुक्त करून राजकीय कोंडी सोडविण्याचा थायलंडच्या संसदेचा (सिनेट) प्रयत्न पुरता फसला आहे. 
घटनापीठाने पंतप्रधान यिंगलक शिनवात्र यांना पदच्युत केल्याने थायलंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिनवात्र यांना पदच्युत केल्यापासून सरकारविरोधी पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीने नव्याने आंदोलन छेडले आहे. नवीन सरकार स्थापन होत नाही, तोवर आंदोलन थांबविण्यात येणार नाही, असा निर्धार या समितीने  केला आहे.
संसद (सिनेट) हंगामी पंतप्रधान नियुक्त करण्यास अपयशी ठरल्याने हंगामी पंतप्रधानांची कशा पद्धतीने नियुक्ती करायची, यावर आता आम्ही मार्ग शोधणार आहोत, अशी भूमिका पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीचे नेते सुथेप थौगसुबान यांनी स्पष्ट केली.
दुसरीकडे सिनेटने हंगामी पंतप्रधानांच्या नियुक्तीबाबत आणखी विशेष अधिवेशन बोलाविण्याचे ठरविले आहे. देशांत शांतता प्रस्थापित करून राष्ट्रीय सुधारणा धोरण अमलात आणण्याचे पूर्णाधिकार पंतप्रधान आणि सरकारला देण्याची गरज आहे.  दरम्यान, सरकारविरोधी आंदोलकांनी हिंसाचार थांबविला नाही, तर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा लष्कराने दिला आहे. नव्याने निवडणुका घेण्याची आंदोलकांची मागणी आहे.   (वृत्तसंस्था)