शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पेशावरमध्ये मशिदीवर तालिबानी हल्ला, २० ठार

By admin | Updated: February 14, 2015 05:51 IST

वायव्य पाकिस्तानातील अशांत भागात शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमलेले असताना तालिबानच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी कलाश्निकोव्ह रायफलीसह केलेल्या हल्ल्यात

पेशावर : वायव्य पाकिस्तानातील अशांत भागात शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी लोक जमलेले असताना तालिबानच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी कलाश्निकोव्ह रायफलीसह केलेल्या हल्ल्यात २० लोक ठार झाले असून, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला तसेच आत्मघातकी बॉम्बचा स्फोट घडवला असून, अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण असा वांशिक हल्ला आहे. सिंध प्रांतातील शिया मशिदीवर हल्ला होऊन लहान मुलांसह ६१ जण ठार झालेल्या दुर्घटनेस बरोबर दोन आठवडे उलटले असताना हा हल्ला झाला आहे. देशातील वांशिक हिंसाचाराची ही सर्वात भीषण अशी दुर्घटना आहे. तेहरिक- ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हयाताबाद येथील इमामबरगह इमामिया मशिदीत शुक्रवारी दुपारी लोक नमाजासाठी (झुहूर) जमलेले असताना एकापाठोपाठ तीन स्फोट झाल्याचे तसेच बंदुकीच्या फैरी झाडल्याचेही ऐकू आले.