शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

परीक्षेला यायचंय.. आधी कपडे काढा - अमेरिकन प्राध्यापकाचा फतवा

By admin | Updated: May 13, 2015 14:57 IST

परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विवस्त्र होऊनच वर्गात यावे असा फतवा व्हिज्युअल आर्ट्सच्या विभागाने प्राध्यापकाने काढला आहे.

ऑनलाइन लोकमत 

कॅलिफोर्निया, दि. १३ - परीक्षाजवळ आल्या की त्यात चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करतात. पण अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या व्हिज्युअल आर्ट्स या विभागातील विद्यार्थ्यांसमोर भलतीच समस्या उभी ठाकली आहे. परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विवस्त्र होऊनच वर्गात यावे असा फतवा या विभागाच्या प्राध्यापकाने काढला आहे. या फतव्याला एका विद्यार्थिनीच्या आईने विरोध दर्शवला आहे. 
यूसी सॅन डिएगो महाविद्यालयातील कला शाखेचे  प्राध्यापक रिकार्डो डॉमिंगेस हे गेल्या अनेक वर्षांपासून व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना 'परफॉर्मिंग द सेल्फ' हा विषय शिकवत आहेत. या विषयाच्या अंतिम परीक्षेसाठी डॉमिंगेस यांनी विद्यार्थ्यांना अजब अट टाकली आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत नग्नावस्थेतच बसावे अशी अटच त्यांनी टाकली आहे. विद्यार्थ्यांनी असे न केल्यास ते नापासही होऊ शकतात असा धमकीवजा इशारा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे असा आरोप एका विद्यार्थिनीच्या आईने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. 
विशेष बाब म्हणजे डॉमिंगेस यांनी हे आरोप फेटाळलेले नाहीत. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांपासून परफॉर्मिंग द सेल्फ या विषयाची अंतिम परीक्षा याच पद्धतीने होत आहे. विद्यार्थ्यांनी अंधूक प्रकाश असलेल्या खोलीत विवस्त्रावस्थेतच स्वत:चे चित्र रेखाटायचे आहे.  स्वतःला शोधण्यासाठी ही एक पद्धत आहे, यात गैर काहीच नाही असे सांगत डॉमिंगेस यांनी या निर्णयाचे समर्थन केले. तर मी माझ्या मुलीला यासाठी कॉलेजमध्ये पाठवत नाही, प्राध्यापकाचा फतवा ऐकून माझ्या पोटात गोळाच आला होता अशी प्रतिक्रिया त्या विद्यार्थीनीच्या आईने दिली.