शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चांद्रवारीचे ‘टीए बिल’ फक्त ३३ डॉलरचे!

By admin | Updated: August 5, 2015 02:20 IST

सेहेचाळीस वर्षांपूर्वी अपोलो-११ यानाने चंद्रावर जाऊन तेथे चालणारा दुसरा मानव म्हणून ख्यातकीर्त झालेले अमेरिकेचे अंतराळवीर कर्नल एडविन ई. एल्ड्रिन (बझ एल्ड्रिन)

लंडन : सेहेचाळीस वर्षांपूर्वी अपोलो-११ यानाने चंद्रावर जाऊन तेथे चालणारा दुसरा मानव म्हणून ख्यातकीर्त झालेले अमेरिकेचे अंतराळवीर कर्नल एडविन ई. एल्ड्रिन (बझ एल्ड्रिन) यांना त्या ऐतिहासिक चांद्रवारीसाठी ‘नासा’कडून अधिकृत प्रवासखर्च म्हणून फक्त ३३.३१ डॉलर एवढी रक्कम दिली गेली होती!आज ८५ वर्षांचे असलेल्या एल्ड्रिन यांनी सप्टेंबर १९६९मध्ये ‘नासा’कडे भरून दिलेले त्या चांद्रसफरीचे ‘ट्रॅव्हल व्हाउचर’ सोमवारी रात्री टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केले. त्या ‘ट्रॅव्हल व्हाउचर’मध्ये एल्ड्रिन यांनी टेक्सासमधील ह्युस्टनपासून चंद्रापर्यंतच्या आणि परतीच्या प्रवासाचा ३३.३१ डॉलरचा खर्च नमूद केला आहे.या व्हाउचरमध्ये प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याचा खर्च तपशीलवार दिलेला असून, वापरण्यात आलेल्या विविध वाहनांमध्ये ‘सरकारी अंतराळयाना’चाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रवासात सरकारकडून भोजन आणि निवासाची सोय करण्यात आल्याचीही त्यात नोंद आहे!अर्थात यात नोंद केलेला खर्च विविध विमानतळांवर येण्या-जाण्यासाठी केलेल्या प्रवासाचा असावा व त्यात अर्थातच खुद्द ‘अपोलो-११’ अंतराळयानाचा खर्च धरलेला नाही, हे उघड आहे.एल्ड्रिन यांनी त्या चांद्रसफरीशी संबंधित दुर्मीळ दस्तावेज टिष्ट्वटरवर टाकला. ‘अपोलो-११’च्या तिन्ही अंतराळवीरांकडून हवाई बेटांवरील होनोलुलू विमानतळावर परत आल्यानंतर कस्टम्स अधिकाऱ्याने भरून घेतलेला फॉर्म आहे.हे अंतराळवीर ‘अपोलो-११’ यानाने केप केनेडी, ह्युस्टन येथून निघून चंद्रावर जाऊन होनोलुलू येथे २४ जुलै १९६९ रोजी परत आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. येताना त्यांनी चंद्रावरील दगड आणि माती आणल्याची नोंद ‘सोबत आणलेल्या सामाना’च्या रकान्यात केली गेली आहे. प्रवासात या अंतराळवीरांना ज्याचा प्रसार होऊ शकेल असा काही रोग किंवा आजार झाला होता का? या रकान्यात ‘अद्याप निदान व्हायचे आहे!’ असे नमूद केले गेले आहे.