शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सौदीच्या राजघराण्यात अचानक ‘वारसा’पालट

By admin | Updated: April 29, 2015 23:40 IST

सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी बुधवारी आश्चर्य वाटावे अशा रीतीने शाही पदव्यांची घोषणा केली.

बैरूत : सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी बुधवारी आश्चर्य वाटावे अशा रीतीने शाही पदव्यांची घोषणा केली. त्यांनी अनेक मंत्रीच नाही, तर आपल्या उत्तराधिकाऱ्यांचाही क्रम बदलत सत्तेच्या सारिपाटाची आपल्याला अनुकूल अशी मांडणी केली. राजे सलमान यांनी मोकरेन बिन अब्दुल अजीज बिन सउद यांचे पद काढून घेत त्यांच्या जागेवर गृहमंत्री मोहंमद बिन नायेफ यांची नवे राजकुमार म्हणून नियुक्ती केली. मोकरेन यांना उपपंतप्रधानपदाच्या जबाबदारीतूनही मुक्त केले. याशिवाय सलमान यांनी त्यांचे पुत्र मोहंमद बिन सलमान यांना उपराजकुमारपदी नियुक्त केले. परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या राजकुमार सउद-अल-फैसल यांनाही पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी अदेल-अल-जुबैर यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती झाली. जुबैर हे राजघराण्याचे सदस्य नाहीत. मात्र, त्यांनी सौदीचे अमेरिकेतील राजदूत म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. या सर्व घडामोडींतून राजे सलमान त्यांचे पूर्वपदस्थ राजे अब्दुल्ला यांच्या धोरणांपासून आणखी दूर जात असल्याचे संकेत मिळतात.