शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध?

By admin | Updated: February 17, 2017 00:48 IST

प्रचंड हिमवृष्टी होणाऱ्या भागात राहणाऱ्या लोकांना हिमवादळानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे

वॉशिंग्टन : प्रचंड हिमवृष्टी होणाऱ्या भागात राहणाऱ्या लोकांना हिमवादळानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होणाऱ्या भागातील लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे संशोधकांनी म्हटले आहे. रस्त्यावरील किंवा घरासमोरील बर्फ हटविताना अनेकदा हृदयविकाराचा झटका येतो. हिवाळ्यात हृदयविकाराचे प्रमाण वाढते. या काळातील हृदयविकाराचा झटका घातक ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्यानंतर बर्फ हटविण्यासाठी महिलांपेक्षा पुरुष अधिक पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांना हा धोका अधिक असतो. फावड्यातील बर्फाचे ओझे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कमाल हृदयगतीच्या ७५ टक्के गतीची गरज भासते. यात अनेकदा ताण पडून हृदयविकाराचा झटका येतो, असे क्युबेक, कॅनडा येथील मॉन्ट्रेल विद्यापीठाचे नथाली आॅगर यांनी सांगितले. क्युबेकमध्ये १९८१ ते २०१४ यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे १,२८,०७३ लोक रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यातील ६८ हजार १५५ लोकांचा मृत्यू झाला होता. संशोधकांनी या माहितीचे विश्लेषण करून हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढला. कॅनडात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान हिमवृष्टी होते. संशोधकांनी त्यांचे विश्लेषण या काळापुरतेच मर्यादित ठेवले आणि हवामान खात्यातून हवामानाची संपूर्ण माहिती मिळवली. अशा परिस्थितीत महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा दगावलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक पुरुष होते, असेही आॅगर यांनी सांगितले.