शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत 'टुडे आय एम अ मुस्लिम, टू' रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: February 20, 2017 17:02 IST

अमेरिकेच्या प्रशासनानं प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ दहा हजारोंच्या संख्येनं लोकांनी रॅली काढली

ऑनलाइन लोकमतन्यू यॉर्क, दि. 20 - सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर अमेरिकेच्या प्रशासनानं घातलेल्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ दहा हजारोंच्या संख्येनी लोकांनी रॅली काढली आहे. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नागरिकांनी एका गाण्याच्या माध्यमातून मुस्लिमांच्या सोबत असल्याचा संदेशही दिला आहे. या रॅलीत अमेरिकेतील काही अभिनेते, दिग्दर्शक, व्यावसायिक, राजकारण्यांनीही सहभाग नोंदवला आहे. रसेल सिमॉन्स आणि सुसन सॅरांडोन यांनीही या रॅलीत सहभागी होत ट्रम्प यांच्या मुस्लिम प्रवेश बंदीचा निषेध नोंदवला आहे. देशातील मुस्लिम भयभीत झाले असल्याने त्यांच्या विषयी सद्‌भावना व्यक्त करण्यासाठीच या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, असंही रॅलीच्या आयोजकांनी सांगितलं आहे.

मुस्लिमांवरील बंदी हटवा, आम्हीही मुस्लिम आहोत असे समजा, ट्रम्प यांचा आम्ही द्वेष करतो, असे फलक आंदोलनकर्त्यांनी झळकावले आहेत. यात न्यूयॉकचे महापौर बिल डे ब्लासिओ हेही सहभागी झाले.

ते म्हणाले, सर्वधर्माचा आदर करण्यासाठी अमेरिकेची स्थापना झालीय. अमेरिकेतील नागरिक मुस्लिमांच्या विरोधात आहेत अशी जी जनभावना निर्माण केली जात आहे ती पुसून टाकण्याची गरज आहे. न्यू यॉर्क शहराचा प्रमुख या नात्याने सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्ही कोणत्याही धर्माचे, वंशाचे किंवा तुमचा जन्म कोठेही झालेला असला तरी हा देश कायम तुमचा आहे आणि तुमचाच राहील. एखाद्या विशिष्ट धर्मावर हल्ला करणे म्हणजे सर्वच धर्मावरील हल्ला समजला गेला पाहिजे, असे ते म्हणाले. जगातील 160 कोटी मुस्लिम शांतताप्रिय आहेत. मी स्वतःलाही अभिमानाने मुस्लिमच समजतो, अशीही भावना बिल डे ब्लासिओ यांनी व्यक्त केली आहे.