शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शरीफांना केला फोन; कोंडी फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2015 00:37 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या घडामोडीकडे उभय देशांतील ठप्प राजनैतिक चर्चेच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. मोदी यांनी शरीफ यांच्यासह आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भाग घेत असलेल्या इतर सार्क देशांच्या प्रमुखांना दूरध्वनी करून विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. संबंध आणखी मजबूत बनविण्यासाठी आपण नवे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना सार्क देशांच्या दौऱ्यावर पाठविणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदी यांच्या दूरध्वनीपूर्वी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. मोदी यांनी शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करणे आणि परराष्ट्र सचिव पाठविणार असल्याचे सांगणे यावरून ते पावले पुढे टाकण्यास तयार असल्याचे दिसते, असे पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही चर्चा लवकर सुरू करू इच्छितो; परंतु ती बिनशर्त असावी असे आम्ही यापूर्वीच भारताला कळविलेले आहे. पाकिस्तानचा हा दृष्टिकोन बहुधा मान्य केला गेला असावा, असे दिसते. भारताचे परराष्ट्र सचिव जेव्हा दौऱ्यावर येतील तेव्हा सर्व मुद्यांवर चर्चा केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला. मोदी यांनी सकाळी शरीफ यांना दूरध्वनी करून भारताचे परराष्ट्र सचिव पाकचा दौरा करणार असल्याचे कळविले, असे शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान शरीफ यांनी २७ मे २०१४ रोजी भारतीय पंतप्रधानांशी झालेल्या भेटीच्या स्मृतींना उजाळा देत सर्व मुद्यांवर चर्चेसाठी भारतीय परराष्ट्र सचिवांच्या पाकिस्तान दौऱ्याचे स्वागत केले. मोदींनी एस. जयशंकर सार्क देशांना भेटी देणार असून ते पाकला येणार असल्याचे शरीफ यांना सांगितले. उभय देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चेच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा केली होती. त्यावर आक्षेप घेत भारताने ही चर्चाच रद्द केली होती. तेव्हापासून उभय देशांतील चर्चा प्रक्रिया ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे. (वृत्तसंस्था)