शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारताने बांधलेल्या अफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेट हल्ला

By admin | Updated: March 28, 2016 12:55 IST

भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर सोमवारी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत 

काबूल, दि. २८ -  भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर सोमवारी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ही संसद इमारत आहे. 
 
सकाळी १०.१५ च्या सुमारास अफगाण संसदेच्या इमारतीजवळ तीन रॉकेट डागण्यात आली. यावेळी स्फोटाचे मोठे आवाज झाले असे अफगाणी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. 
 
अफगाण संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांची बैठक सुरु असताना हा रॉकेट हल्ला झाला. अद्यापपर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 
 
अफगाणिस्तानला संसदेची नवी इमारत बांधून देण्यात  भारताने निधीसह अन्य मदत मोठया प्रमाणावर केली आहे.  मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन झाले होते. तिथून परतताना त्यांनी अचानक पाकिस्तानला धावती भेट दिली होती.