शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळला पुराचा धोका

By admin | Updated: May 25, 2015 00:51 IST

पश्चिम नेपाळमध्ये मोठी दरड कोसळून भारत व नेपाळमधून वाहणाऱ्या एका प्रमुख नदीचा प्रवाह अडला असून, पुराची भीती निर्माण झाल्याने या भागातील

काठमांडू : पश्चिम नेपाळमध्ये मोठी दरड कोसळून भारत व नेपाळमधून वाहणाऱ्या एका प्रमुख नदीचा प्रवाह अडला असून, पुराची भीती निर्माण झाल्याने या भागातील हजारो नागरिक पलायन करत आहेत. या भागात अचानक पूर येण्याची भीती आहे. काठमांडूपासून १४० कि.मी. वायव्येला असणाऱ्या मायाग्दी जिल्ह्यातील काली गंडकी नदीत दरड कोसळून रात्रीत मोठा खोल व सतत वाढणारा नवा जलाशय निर्माण झाला आहे. नदीचा प्रवाह अडल्यामुळे तयार झालेल्या या जलाशयाची पातळी १५० मीटरपर्यंत वाढल्याचे नेपाळ पोलिसांनी टिष्ट्वटरवर म्हटल आहे. या भागात सैनिक तैनात करण्यात आले असून, आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही. नदीच्या पात्रात सातत्याने दरडी कोसळत असून, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने या नदीच्या दोन्ही भागांत हाय अलर्टचा इशारा दिला. कालीगंडकी नदीच्या पात्रात प्रवाहाच्या वरच्या बाजुला बेनीबझारपासून १० कि.मी. अंतरावर कृत्रिम तलाव निर्माण झाला असून, बेनीबझार व गालेश्वर बझार दोन्ही गावांतील लोकांना हाय अलर्टचा इशारा देण्यात येत आहे, असे या मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. भूकंपामुळे दरडी कोसळतात सर्वसाधारणपणे पावसाळ्यात पावसामुळे दरडी कोसळतात; पण आता भूकंपामुळे जमिनीला तडे गेले व ढिगारे तयार झाले आहेत ,त्यामुळे दरडी कोसळत आहेत असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दगड, माती व चिखल यांचे ढिगारे कोसळत असून, मोठा आवाज होत असल्याचे इ कांतीपूरने म्हटले आहे. नवालपारासीचे जिल्हाधिकारी हरिप्रसाद मैनाली यांनी सांगितले की कृत्रिम जलाशय फुटू नये म्हणून गंडक कालव्याचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गृहमंत्री बामदेव गौतम व संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे असे पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला यांनी सांगितले आहे. २५ एप्रिलच्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर नेपाळमध्ये दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. (वृत्तसंस्था)